-
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगभर चर्चेत आहे. (Photo Source: @ambani_update/instagram)
-
१२ जुलैला पार पडलेल्या या लग्नाला जगभरातून खास पाहुणे आले होते. (पीटीआय फोटो)
-
या लग्नात मुकेश अंबानींनी उदार मनाने पैसा खर्च केला आहे. (Photo Source: @ambani_update/instagram)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानींच्या लग्नावर सुमारे ५,००० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे, जो मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीच्या फक्त ०.५ टक्के खर्च आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
मात्र, लग्नावर एवढा खर्च करूनही भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती कमी होण्याऐवजी वाढली आहे. (पीटीआय फोटो)
-
शेअर बाजाराच्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये एक टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे अंबानींची संपत्तीही वाढली आहे. (पीटीआय फोटो)
-
ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या इंडेक्सनुसार, शुक्रवारी अंबानींच्या संपत्तीत १.२१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १०,१०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. (पीटीआय फोटो)
-
यासह त्यांची एकूण संपत्ती १२१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील त्यांचे ११ वे स्थान कायम आहे. (पीटीआय फोटो)
-
यावर्षी त्यांची एकूण संपत्ती २४.२ अब्ज डॉलरने वाढली आहे.
-
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीबद्दल बोलायचे झाले तर अखेर काल त्याने त्याची प्रेयसी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली आहे. (Photo Source: @ambani_update/instagram)
-
यानंतर आज १३ जुलै रोजी आशीर्वाद सोहळा होणार आहे. १४ जुलै रोजी मंगल उत्सव म्हणजेच विवाहसोहळा संपन्न होणार आहे. (Photo Source: @ambani_update/instagram)
-
(Photo Source: @ambani_update/instagram) (हे पण वाचा:‘अशी’ आहे अनंत आणि राधिकाची प्रेम कहाणी! वाचा बालपणीची मैत्री ते जोडीदार बनण्यापर्यंतची गोष्ट, कोविडच्या काळात दोघेही… )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”