-
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक रॅलीदरम्यान गोळीबार झाला. गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली आणि ते मृत्यूपासून थोडक्यात बचावले. डोनाल्ड ट्रम्प हे एक सुप्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. (@MelaniaTrump/Insta)
-
डोनाल्ड ट्रम्प हे केवळ त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासाठीच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. दरम्यान आज आपण माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी किती वेळा लग्न केले आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से जाणून घेऊया: (इंडियन एक्सप्रेस)
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केले आहे. त्यांची तिसरी पत्नी मेलानिया ट्रम्प आहे, जिच्यावर पहिल्या नजरेतच डोनाल्ड यांना प्रेम झाले. त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचा किस्सा खूपच रंजक आहे. (@MelaniaTrump/Insta)
-
डोनाल्ड ट्रम्प यांना तीन पत्नींपासून पाच मुले आहेत. ट्रम्प यांचे पहिले लग्न १९७७ मध्ये इव्हानासोबत झाले होते. दोघांची पहिली भेट १९७६ साली एका हॉटेलमध्ये झाली होती. इव्हाना आधीच विवाहित होती आणि डोनाल्ड ट्रम्प यांना भेटल्यानंतर तिने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला. ट्रम्प यांचे लग्न जवळपास १३ वर्षे टिकले आणि त्यानंतर १९९० मध्ये दोघेही वेगळे झाले. इव्हाना यांचे २०२२ मध्ये निधन झाले. (@IvankaTrump/Twitter)
-
डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची पहिली पत्नी इव्हानापासून डोनाल्ड ट्रम्प जूनियर, इवांका ट्रम्प आणि एरिक ट्रम्प अशी तीन मुले होती. डोनाल्ड ट्रम्पपासून विभक्त झाल्यानंतर इव्हानाने आणखी तीन लग्ने केली होती पण त्यापैकी एकही लग्न टिकले नाही. (@MelaniaTrump/Insta)
-
डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी पत्नी अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका मार्ला मॅपल्स होती. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाच्या दरम्यानच त्यांच्या अफेअरच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यानंतर त्यांच्या रोमान्सची छायाचित्रे टॅब्लॉइड्समध्ये प्रसिद्ध झाली, त्यानंतर ते दोघेही चर्चेत राहिले. डोनाल्ड आणि मार्ला यांनी १९९३ मध्ये एकमेकांशी लग्न केले. पण हे नातंही फक्त चार वर्षं टिकलं आणि त्यानंतर १९९९ मध्ये दोघेही वेगळे झाले. (@ itsmarlamaples /Insta)
-
दरम्यान, मार्ला मॅपल्सचे डोनाल्ड ट्रम्पच्या सुरक्षा रक्षकाशी प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची दुसरी पत्नी मारलापासून एक मुलगी आहे, तिचे नाव टिफनी ट्रम्प आहे. (@ itsmarlamaples /Insta)
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दोन पत्नींना घटस्फोट दिल्यांनतर ते अविवाहित आणि एकटे राहत होते. एके दिवशी डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क फॅशन वीकच्या पार्टीला गेले होते तिथे त्यांची मेलानियाशी भेट झाली. मेलानिया ही पॅरिस आणि मिलानच्या फॅशन जगतातील प्रसिद्ध मॉडेल्सपैकी एक होती आणि त्या काळात तिच्या सौंदर्याची खूप चर्चा सुरु होती. पहिल्या भेटीतच डोनाल्ड ट्रम्प मेलानियाच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या पहिल्या भेटीतच अवघ्या ५ मिनिटांतच ट्रम्प यांनी मेलानियाला तिचा फोन नंबरही मागितला. (@MelaniaTrump/Insta)
-
त्यावेळी मेलानिया २८ वर्षांच्या होत्या आणि ट्रम्प ५२ वर्षांचे. यानंतर दोघांमध्ये चर्चा आणि भेटीगाठी सुरू झाल्या. १९९९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. मात्र दरम्यानच्या काळात दोघांमध्ये ब्रेकअप झाले आणि ट्रम्प पुन्हा एकदा सिंगल राहू लागले. (@MelaniaTrump/Insta)
-
२००० साली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हरले तेव्हा काही महिन्यांनंतर ते आणि मेलानिया पुन्हा एकत्र दिसले. (इंडियन एक्सप्रेस)
-
पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियाला सुमारे १.५ दशलक्ष डॉलर किंमतीची हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज केले, त्यानंतर दोघांनी २००५ मध्ये लग्न केले. त्यानंतर मेलानियापासून ट्रम्प यांना बॅरन ट्रम्प नावाचा मुलगा झाला. (इंडियन एक्सप्रेस) हेही वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ‘या’ रायफलने करण्यात आला हल्ला; अमेरिकेत प्रसिद्ध असलेली ही …
पुढल्या महिन्यापासून पैसाच पैसा! शनिदेवाच्या राशीत राहूचे गोचर होताच ‘या’ ५ राशी होणार गडगंज श्रीमंत? तुम्ही आहात का भाग्यवान?