-
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीदरम्यान शनिवारी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
-
त्यामध्ये एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. त्यामुळे थोडक्यात त्यांचा प्राण वाचला.
-
यानंतर हल्लेखोराला ठार करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षांवर जीवघेणे हल्ले करण्याच्या घटना याधीही घडल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊयात.
-
अब्राहम लिंकन
१८६५ साली अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या करण्यात आली. यामध्ये जॉन विल्क्स बूथ या हल्लेखोराने वॉशिंग्टनमधील फोर्ड थिएटरमध्ये “अवर अमेरिकन कजिन” या कार्यक्रमात सहभागी होत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरील व्यक्तीवर केला गेलेला हा पहिला हल्ला होता. -
जेम्स गारफिल्ड
सन १८८१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांनी जेम्स गारफिल्ड यांची हत्या करण्यात आली. चार्ल्स गिटॉ या हल्लेखोराने वॉशिंटन रेल्वे स्टेशनवर न्यू इंग्लंडसाठी ट्रेन पकडत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एपी वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार गिटॉ दोषी सिद्ध झाल्यांनतर जून १८८२ त्याला मध्ये फाशीची शिक्षा झाली. -
विल्यम मॅककिनले
न्यू यॉर्कमधील बफेलो या शहरात भाषणानंतर लोकांशी बोलताना विल्यम यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. छातीवर झाडण्यात आलेल्या गोळ्यांनी मॅककिनले यांचे पुढील आठवड्यात उपचारादरम्यान निधन झाले. डेट्रॉईट येथील रहिवासी असलेल्या लिओन एफ झोल्गोझ या २८ वर्षीय बेरोजगार तरुणाने गोळीबाराची कबुली दिली. नंतर त्याला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली. -
जॉन एफ केनेडी
जॉन एफ केनेडी आणि त्यांच्या पत्नी फर्स्ट लेडी जॅकलीन केनेडी नोव्हेंबर १९६३ मध्ये डॅलसला भेट देण्यासाठी जात असताना, ली हार्वे ओसवाल्ड या हल्लेखोराने त्यांच्यावर पावरफुल रायफलने गोळ्या झाडल्या. यात जॉन एफ केनेडी यांचा मृत्यू झाला. -
रोनाल्ड रीगन
रोनाल्ड रीगन वॉशिंग्टन डीसी येथे भाषण दिल्यानंतर त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याकडे परत जात असताना जॉन हिंकले जूनियर या हल्लेखोराने रीगन यांच्यावर गर्दीतून गोळ्या झाडल्या. मात्र या हल्ल्यात सुदैवाने रेगन बचावले.

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…