-
महाराष्ट्र संवर्ग प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या युपीएससीकोटाच्या बनावट कागदपत्रांमुळे चर्चेत आहे. त्याच्यासोबत तिचे कुटुंबीयही या वादात सापडले आहेत.
-
या प्रकरणात मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकरला आपल्या कागदपत्रांसह अकादमीत परत बोलावले. याशिवाय महाराष्ट्रात सुरू असलेला तिचे प्रशिक्षण कार्यक्रमही तातडीने रद्द करण्यात आला.
-
सोशल मीडियावर पूजा खेडकरच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती पिस्तूलसोबत दिसत आहे. त्यांच्यावर शेतक-यांना धमकावल्याचा आरोप केला गेला आहे. यासोबतच पूजाच्या वडिलांवरही शेतकऱ्यांची जमिनी ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे. सध्या या प्रकरणाची एसीबीकडून चौकशी सुरू आहे.
-
शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पूजाचे वडील दिलीप खेडकर सध्या बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
-
महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूजाचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची चौकशी देखील सुरू केली आहे. दिलीप खेडकर हे ही आयएएस राहिले असून सेवेत असताना त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित करण्यात आले होते. दिलीप खेडकर गेल्या वर्षी ३१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ च्या संचालक पदावरून निवृत्त झाले होते.
-
दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अहमदनगरमधून २०२४ लोकसभा निवडणूकही लढवली आहे. त्यांच्याकडे सुमारे ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्याकडेही कोटींची संपत्ती आहे. दरवर्षी पूजा ४४ लाख रुपये कमावते. तिची संपत्ती तिच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा खेडकरच्या नावावर पुण्यात चार आणि अहमदनगरमध्ये सात प्लॉट्स आहेत. पुण्यातील घरांची किंमत ६ ते ८ कोटी रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार