-
सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याची अनेकांना लालसा असते. हे रिल्स जीवघेणे ठरत असतानाही अनेकजण रिल्स किंवा फोटोसाठी नको तितके धाडस करतात आणि जीव गमावतात. प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर अन्वी कामदार या २७ वर्षीय मुलीचा अशाच एका दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
अन्वी कामदारने जगभर फिरून अनेक ट्रव्हल व्हिडीओ तयार केलेले आहेत. पर्यटकांना चांगली स्थळं, हॉटेल्स आणि समुद्रकिनारे दाखविण्यासाठी ती रिल्स बनवत असे.
-
मुळची मुंबईची असलेली अन्वी कामदार व्यवसायाने सीए आहे. इन्स्टाग्रामवर ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ती प्रसिद्ध असून तिच्या theglocaljournal या इन्स्टा अकाऊंटला अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
-
सध्या पावसाचे दिवस असून अनेकांना निर्सगाच्या कुशीत किंवा धबधब्याजवळ व्हिडीओ करायचे असतात. अन्वी कामदारही आपल्या एका सहकाऱ्यासह रायगडच्या माणगाव येथे कुंभे धबधब्याजवळ पर्यटनासाठी आली होती.
-
कुंभे धबधब्याच्या कड्यावर इन्स्टाग्रामसाठी रिल बनवत असताना अन्वीचा तोल गेला आणि ती ३०० फूट खोल दरीत कोसळली.
-
पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन करत असताना काळजी घ्यावी. कडेकपाऱ्यात, धबधब्याखाली जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन वारंवार केले जात असतानाही रिल्स आणि फोटोसाठी काही युवक नको ते धाडस करून जीव गमावतात.
-
दरीत कोसळल्यानंतर तिच्या सहकाऱ्याने तातडीने याची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात कळवली.
-
माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केले. मात्र खोल दरी असल्याने बचाव कार्यात अडचणी येत होत्या.
-
कोलाड, माणगाव, महाड येथून प्रशिक्षीत बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. दोरीच्या साह्याने बचाव पथके दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. तिला स्ट्रेचरच्या साह्याने दोरीने ओढून वर काढण्यात आले. मात्र माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला.
-
अन्वीला वाचविण्यासाठी तब्बल सहा तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले होते. अन्वी जर लवकर मिळाली असती तर तिचा जीव वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया तिच्या सहकाऱ्यांनी दिली.
-
छत्रपती संभाजीनगर येथेही काही दिवसांपूर्वी रिल बनविण्याच्या नादात एका महिलेने गाडी रिव्हर्स घेतली आणि थेट दरीत गाडीसह कोसळली होती. या घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य