-
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात काही तरी बिनसलं असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या.
-
हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाची बातमीही सोशल मीडियावर पसरली होती पण त्यावेळी दोघांनीही यावर कोणतेही वक्तव्य केले नव्हते.
-
२५मे रोजी Reddit वर एक पोस्ट आली होती, ज्यानुसार नताशाने इंस्टाग्रामवर हार्दिकसोबतचे तिचे काही जुने फोटो डिलीट केले, तर तिच्या युजरनेममधून पंड्या हे नाव देखील काढून टाकले.
-
अनेक वेळा त्यांच्यात काहीही ठीक नसल्याच्या बातम्या आल्या, मात्र त्या अफवा आहेत की सत्यपारिस्थिती हे कोणालाही माहीत नव्हतं.
-
पण सर्व अफवांना आणि चर्चेला पूर्णविराम देत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर घटस्फोटाची घोषणा केली आहे.
-
हार्दिक आणि नताशा यांनी सांगितले की ते परस्पर संमतीने वेगळे होत आहेत पण दोघे मिळून मुलाचे संगोपन करतील.
-
यापूर्वी नताशाने एक फोटो शेअर केला होता ज्यात ती तिच्या मूळ गावी सर्बियामध्ये होती. यावेळी तिचा मुलगा तिच्यासोबत होता. याच पार्श्वभूमीवर नताशाच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे आणि तिच्याकडे किती मालमत्ता आहे हे जाणून घेऊया.
-
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची पत्नी आणि मुळची सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि नृत्यांगना असलेली नताशा स्टॅनकोविक भारतीय मनोरंजन विश्वातील तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे.
-
४ मार्च १९९२ रोजी सर्बियामध्ये नताशा स्टॅनकोविचचा जन्म झाला. ३२ वर्षीय नताशाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि नंतर बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी ती भारतात आली.
-
२०१३ साली प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तसेच ती अजय देवगणसोबत ‘आयो जी’ या डान्स नंबरमध्ये दिसली होती.
-
बादशाह आणि आस्था गिल यांच्या लोकप्रिय डान्स नंबर ‘डीजे वाले बाबू’ या गाण्यानंतर ती आणखी लोकप्रिय झाली.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये आहे आणि नताशा स्टॅनकोविकची एकूण संपत्ती त्यापेक्षा कमी आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, नताशा स्टॅनकोविकची संपत्ती २० कोटी रुपये आहे जी हार्दिकपेक्षा खूपच कमी आहे.
-
रिपोर्ट्समध्ये असेही बोलले जात आहे की घटस्फोटानंतर हार्दिक नताशाला चांगली रक्कम देऊ शकतो आणि त्यानंतर नताशाची संपत्ती वाढू शकते. मात्र, या गोष्टींची अद्याप पुष्टी झालेली नाही.
-
नताशाने भारतात राहून बरेच काम केले आहे पण आता ती सर्बियाला गेली आहे. सध्या ती तिथेच राहून आपला मुलगा अगस्त्यचा सांभाळ करणार आहे.
-
नताशाच्या खर्चाबद्दल बोलायचे झाले तर ती सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर म्हणून पैसे कमावते, याशिवाय ती डान्स, अभिनय आणि मॉडेलिंग देखील करते. ती सर्बियामध्येही हे काम सुरू ठेवू शकते.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख