-
हार्दिक पांड्या नताशा स्टॅनकोविक घटस्फोट
हार्दिक पंड्या नताशा स्टॅनकोविचपासून घटस्फोट घेत आहे. हार्दिक आणि नताशाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. घटस्फोटाच्या बातमीनंतर हार्दिक पंड्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. -
२५ मे रोजी Reddit वर एक पोस्ट आली होती, ज्यानुसार नताशाने इंस्टाग्रामवर हार्दिकसोबतचे तिचे काही जुने फोटो डिलीट केले, तर तिच्या युजरनेममधून पंड्या हे नाव देखील काढून टाकले.
-
अनेक वेळा त्यांच्यात काहीही ठीक नसल्याच्या बातम्या आल्या, मात्र त्या अफवा आहेत की सत्यपारिस्थिती हे कोणालाही माहीत नव्हतं.
-
पण सर्व अफवांना आणि चर्चेला पूर्णविराम देत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर घटस्फोटाची घोषणा केली आहे. हार्दिक आणि नताशा यांना अगस्त्य नावाचा मुलगाही आहे.
-
मोहम्मद अझरुद्दीन घटस्फोट
मोहम्मद अझरुद्दीनने १९८७ मध्ये नौरीनसोबत अरेंज मॅरेज केले होते. विवाहित असूनही मोहम्मद अझरुद्दीन बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजला हिच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीन हे दोन मुलांचे वडील होते. -
मोहम्मद अझरुद्दीनने १९९६ मध्ये संगीता बिजलानीसोबत लग्न करण्यासाठी नौरीनला घटस्फोट दिला. मात्र, संगीता बिजलासोबतचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही आणि २०१० मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर २०१७ मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने शॅनन मेरीसोबत तिसरे लग्न केले.
-
जवागल श्रीनाथ यांनी १९९९ मध्ये ज्योत्स्नासोबत लग्न केले. पण जवागल श्रीनाथने पत्रकार माधवी पत्रावलीशी लग्न करण्यासाठी २००७ मध्ये आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर २००८ मध्ये जवागल श्रीनाथने माधवी पत्रावलीसोबत पुन्हा लग्न केले.
-
विनोद कांबळी
क्रिकेटर विनोद कांबळीचे पहिले लग्न १९९८ मध्ये नोएला लेमिससोबत झाले होते. विवाहित असला तरी तो अँड्रिया हेविट नावाच्या महिलेच्या प्रेमात पडला. त्यानंतर विनोद कांबळीने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर दुसरे लग्न केले. -
दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रिण निकिता वंजारासोबत २००७ साली लग्न केले. त्यांच्या लग्नाला जेमतेम ५ वर्षे झाली असतील, जेव्हा निकितचे आणखी एक क्रिकेटर मुरली विजयसोबत अफेअर असल्याची बातमी आली. यामुळे कार्तिक आणि निकिता २०१२ मध्ये वेगळे झाले.
-
यानंतर दिनेश कार्तिक नैराश्यात गेला आणि त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. निकिता सध्या मुरली विजयसोबत आहे. दुसरीकडे, दिनेश कार्तिकने ऑगस्ट २०१५ मध्ये भारतीय स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले.
-
मोहम्मद शमी
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या वैवाहिक आयुष्यातही भयंकर वादळ आले. २०१८ मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गैरवर्तन आणि छळाचा आरोप केला होता. याला उत्तर देताना मोहम्मद शमीने सर्व आरोप फेटाळून लावत आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. -
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ २०१८ पासून विभक्त झाले असून त्यांच्यामध्ये कायदेशीर खटला सुरू आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांना एक मुलगीही आहे. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला, पण बीसीसीआयने स्थापन केलेल्या चौकशी समितीने शमीला क्लीन चिट दिली.
-
अनेक वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन आयशा मुखर्जीला डेट केल्यानंतर शिखर धवनने २०१२ मध्ये तिच्याशी लग्न केले होते. आयशाचे यापूर्वी एकदा लग्न झाले होते आणि त्या लग्नापासून तिला दोन मुली आहेत. शिखर धवन आणि आयेशा मुर्खर्जी यांना जोरावर नावाचा १० वर्षांचा मुलगा आहे.
-
शिखर धवन २०१५ पासून आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियात राहत होता. खरं तर, जेव्हा दोघांमधील संबंध ताणले गेले, तेव्हा शिखर धवनने आरोप केला की, आयशा आपला मुलगा जोरावरसोबत अनेक वर्षे ऑस्ट्रेलियात राहिली आणि भारतात येण्यास नकार देत राहिली.
-
अखेर ऑक्टोबर २०२३ मध्ये न्यायालयाने मानसिक छळाच्या कारणास्तव शिखर धवनच्या घटस्फोटाच्या अर्जाला परवानगी दिली.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”