-
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी राष्ट्रपती महात्मा गांधी दिल्लीत नव्हते. आज आपण स्वातंत्र्य दिनाशी संबंधित ७ रंजक गोष्टी जाणून घेऊयात (इंडियन एक्सप्रेस)
-
स्वातंत्र्याच्या दिवशी राष्ट्रपिता कुठे होते?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी महात्मा गांधी दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर बंगालमधील नोआखली येथे होते. त्यावेळी ते हिंदू आणि मुस्लिमांमधील जातीय हिंसाचार थांबवण्यासाठी उपोषणावर होते. (इंडियन एक्सप्रेस) -
हे उत्तर दिले
देशाच्या स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महात्मा गांधींना दिल्लीतून निमंत्रित करण्यात आले तेव्हा ते म्हणाले होते की, “माझ्यासाठी स्वातंत्र्य घोषित करण्यापेक्षा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये शांतता राखणे महत्त्वाचे आहे. हिंदू-मुस्लिम एकमेकांची हत्या करत असताना मी आनंदोत्सव साजरा करायला कसा येऊ शकतो,” असे त्यांनी पत्राद्वारे लिहिले होते. (इंडियन एक्सप्रेस) -
15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात आला नव्हता.
दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात. मात्र या पहिल्यांदाच साजऱ्या होत असलेल्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात आला नाही. १६ ऑगस्ट १९४७ रोजी जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली नव्हती. (इंडियन एक्सप्रेस) -
महात्मा गांधींनी नेहरूंचे ऐतिहासिक भाषण ऐकले नव्हते
१४ ऑगस्टच्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी व्हाईसरॉय लॉज, आताच्या राष्ट्रपती भवन येथून ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ हे ऐतिहासिक भाषण दिले, जे रोडिओच्या माध्यमातून देशभरात तसेच जगभर ऐकले गेले. (इंडियन एक्सप्रेस) -
पण महात्मा गांधींनी त्यांचे ऐतिहासिक भाषण ऐकले नाही कारण ते त्या दिवशी रात्री नऊ वाजता झोपायला गेले होते. (इंडियन एक्सप्रेस)
-
राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले नाही
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाचे राष्ट्रगीत नव्हते. खरे तर रवींद्रनाथ टागोरांच्या ‘जन गण मन’ ला १९५० मध्ये राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला होता. मात्र, त्यांनी १९११ मध्येच राष्ट्रगीत लिहिले होते. (इंडियन एक्सप्रेस) -
१५ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा आखण्यात आली नव्हती.
१५ ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा नव्हती. १७ ऑगस्ट रोजी दोन्ही देशांमधील सीमारेषा रॅडक्लिफ रेषा (Radcliffe Line) काढण्यात आली. त्याच वेळी स्वातंत्र्यानंतर, ५६० संस्थानांचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला. (इंडियन एक्सप्रेस) -
हे देशही १५ ऑगस्टला स्वतंत्र झाले
भारताव्यतिरिक्त, आणखी तीन देश दक्षिण कोरिया, बहरीन आणि काँगो देखील १५ ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करतात. १५ ऑगस्ट १९४५ रोजी दक्षिण कोरिया जपानपासून स्वतंत्र झाला. बहरीन १५ ऑगस्ट १९७१ रोजी ब्रिटनपासून आणि १५ ऑगस्ट १९६० रोजी काँगो देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला. (इंडियन एक्सप्रेस)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार