-
दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये झालेल्या कोचिंग मधील दुर्घटनेनंतर दृष्टी आयएएससह इतर अनेक कोचिंग सेंटर्सना चौकशीनंतर उल्लंघन केल्याबद्दल सील करण्यात आले आहे. यानंतर बिहार सरकारने पाटणासह सर्व जिल्ह्यांमध्ये असलेल्या कोचिंग सेंटरची चौकशी करण्याचे निर्देशही दिले होते. तपासादरम्यान खान कोचिंग सेंटरमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या, त्या सुधारण्यासाठी खान सरांनी वेळ मागितला आहे. (@Khan Global Studies/Twitter)
-
खान सर हे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची शिकवण्याची शैली खूप वेगळी आहे जी लाखो लोकांना आवडते. पण खान सरांचे खरे नाव काय आहे आणि ते स्वतः किती शिक्षित आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? (@Khan Global Studies/Twitter)
-
खान सरांचे ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ नावाचे स्वतःचे YouTube चॅनल आहे. या चॅनेलवर त्यांचे सुमारे २१.३ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. (@Khan Global Studies/Twitter)
-
खान सरांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका लष्करी कुटुंबात झाला. त्यांच्या खऱ्या नावाबाबत बरेच मतभेद आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर खान सरांचे खरे नाव ‘फैजल खान’ आहे. (@Khan Global Studies/Twitter)
-
मीडिया रिपोर्ट्स नुसार खान सरांचे वडील कंत्राटदार आहेत. त्याचा मोठा भाऊ सैन्यात होता. खान सरांनाही सैन्यात भरती व्हायचे होते पण ते जमले नाही. (@Khan Global Studies/Twitter)
-
खान सरांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण परमार मिशन स्कूल, देवरिया, यूपी येथून केले. त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून १०वी आणि हिंदी माध्यमाच्या शाळेतून १२वी केली. खान सरांनी पॉलिटेक्निकच्या परीक्षेची तयारीही केली आहे. (@Khan Global Studies/Twitter)
-
मीडिया रिपोर्ट्स नुसार खान सरांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथून त्यांनी एमएससीचे शिक्षण घेतले. (@Khan Global Studies/Twitter)
-
पाटण्याबरोबरच खान सरांनी अलीकडेच दिल्लीतही कोचिंग सेंटर सुरू केले आहे. खान सरांनी एप्रिल २०१९ मध्ये खान जीएस रिसर्च सेंटर यूट्यूब चॅनेल सुरू केले ज्यामुळे ते देशभरात स्टार बनले. अवघ्या एका महिन्यात या चॅनेलवर सुमारे दहा लाख नवीन सदस्य झाले. (@Khan Global Studies/Twitter)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’