-
अनेकदा सोशल मीडियावर काही ना काही ट्रेंड व्हायरल होतात. बरेच लोक हे ट्रेंड फॉलो करतात, परंतु त्यांना त्यांचा अर्थ काय आहे हे माहित नसतं.
-
आजकाल इन्स्टाग्रामवर ‘चिन टपाक डम डम’ असा एक रील ऑडिओ व्हायरल होत आहे.
-
‘चिन टपाक डम डम’ हे चार छोटे शब्द आजकाल सर्व वयोगटातील लोकांकडून ऐकायला मिळत आहेत. या ऑडिओवर अनेक रील्स आणि मीम्स बनवले जात आहेत. पण हा विचित्र ऑडिओ काय आहे आणि कुठून आला आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
-
‘चिन टपाक डम डम’ हा ऑडिओ लहान मुलांच्या आवडत्या कार्टून शो ‘छोटा भीम’मधून घेण्यात आला आहे. या शोमध्ये ताकिया नावाचा खलनायक आहे. हा संवाद याच पात्राचा आहे.
-
ताकिया जेंव्हा कोणतीही जादुई शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात. हा डायलॉग एकप्रकारे त्याची सिग्नेचर स्टाइल आहे.
-
जेव्हा एका चाहत्याने कार्टूनचा हा भाग पुन्हा पाहिला, त्यानंतर हा डायलॉग व्हायरल झाला.
-
नंतर त्याने याबद्दल पोस्ट केली व हा डायलॉग व्हायरल झाला. हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची क्लिप इंटरनेटवर व्हायरल होताच लोकांनी त्यावर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.
-
महत्वाचं म्हणजे या संवादाचा काहीही अर्थ नाही. लोक फक्त मनोरंजनासाठी वापरत आहेत. हा डायलॉग मीम्स, रिंगटोन, स्टिकर्ससाठी वापरला जात आहे.
-
अनेकांनी तर ‘चिन टपाक डम डम’ हा ऑडिओ रिंग टोन म्हणून वापरला आहे.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल