-
सर्व प्राण्यांमध्ये, श्वान हे मानवाच्या सर्वात जवळचा प्राणी आहे. जेव्हा जेव्हा निष्ठेचा विचार येतो तेव्हा एकच प्राणी लोकांच्या मनात येतो आणि तो म्हणजे श्वान.
-
श्वान आपल्या प्रिय मालकाप्रति बिनशर्त प्रेम आणि निष्ठा दाखवतात आणि यामुळेच ते मृत्यूपर्यंत आपल्या मालकांना सोडत नाहीत.
-
जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना श्वान पाळायला आवडते. अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील श्वानप्रेमींपैकी एक असाल तर ही बातमी ऐकून तुम्हालाही त्रास होईल.
-
तुर्कीमध्ये नुकताच देशातील भटक्या श्वानांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे देशातील रस्त्यावर निदर्शने सुरू झाली आहेत.
-
एका अहवालानुसार, तुर्कीमध्ये रस्त्यावरील श्वानांची एकूण लोकसंख्या सुमारे चार दशलक्ष आहे. हे श्वान अतिशय धोकादायक बनले आहेत.
-
त्यातच लोकसंख्या वाढल्याने नागरिकांचे जीवन दयनीय झाले आहे. तुर्की सरकारच्या म्हणण्यानुसार, आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या श्वानांना फाशीची शिक्षा दिली जाईल.
-
तुर्कस्तानच्या नवीन कायद्यानुसार, पालिकेने भटक्या श्वानांना एकत्र करून त्यांना दत्तक प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यापूर्वी त्यांचे लसीकरण, त्यांना नपुंसक करणे आणि इतर उपचारांसाठी आश्रयस्थानांमध्ये ठेवणे आवश्यक आहे. जे श्वान जखमी किंवा आजारी आहेत त्यांना इच्छा मृत्यू देण्यात येईल.
-
हा कायदा मंजूर झाल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये, हजारो लोक कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली आहे.
-
भटक्या प्राण्यांच्या हत्येला परवानगी देणारे कायद्यातील ते कलम रद्द करावे, अशी लोकांची मागणी आहे.
-
तुर्कीचे विरोधी पक्षाचे खासदार, प्राणी कल्याण गट आणि इतरांनी या विधेयकाला नरसंहार कायदा म्हटले आहे. विरोधी खासदारांनी सांगितले की ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयात हा कायदा रद्द करण्याची मागणी करतील. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स आणि एएफपी)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य