-
आयफोन घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण, किंमत जास्त असल्यामुळे प्रत्येक जण आयफोन घेऊ शकत नाही. त्यामुळे काही जण सेकंड हॅण्ड आयफोन घेण्याचा विचार करतात.(फोटो सौजन्य: indian express / freepik)
-
सेकंड हॅण्ड आयफोन घेणे काही वाईट नाही. पण, त्यासाठी तुम्हाला आयफोनमधील काही गोष्टी चेक करणे गरजेचे आहे; अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. सेकंड हॅण्ड आयफोन घेताना घ्यावयाची काळजी खालीलप्रमाणे… (फोटो सौजन्य: Anuj Bhatia/Indian Express / freepik )
-
सीरियल नंबर चेक करा : सर्वांत आधी आयफोनच्या सेटिंगमध्ये जा. जनरल ऑप्शनमध्ये जाऊनअबाउट सेक्शनवर क्लिक करा. या ठिकाणी iPhone चा सीरियल नंबर दिसेल तो कॉपी करून Apple च्या अधिकृत वेबसाइटवर टाकल्यास तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील. त्यामध्ये ॲक्टिव्हेशन डेटा, वॉरंटी पीरियड यांचा समावेश असतो. ( फोटो सौजन्य : Apple Hub / ट्विटर)
-
आयफोन चेक करा : तुम्ही सेकंड हॅण्ड आयफोन खरेदी करणार असल्यास, डील करण्यापूर्वी डिव्हाइसची कोणत्याही स्क्रॅच नाही ना हे तपासून घ्या. असे केल्याने तुम्हाला डील करताना किंमत करण्यासाठी तुम्हाला आणखी एक कारण मिळेल. ( फोटो सौजन्य : Apple Hub / ट्विटर)
-
डिस्प्ले तपासून घ्या : आयफोन घेताना डिस्प्ले, बॅटरी तपासून घ्या. आयफोनच्या डिस्प्ले तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ट्रूटोन फीचर. हे तपासण्यासाठी आयफोनच्या सेटिंग्जवर जा, डिस्प्ले व ब्राइटनेसवर क्लिक करा. आता तुम्ही ट्रू टोन सुरू करू शकता. जर तुम्ही तसे करू शकत नसाल, तर आयफोन दुरुस्त केला गेल्याची दाट शक्यता आहे. ( फोटो सौजन्य : Anuj Bhatia/Indian Express)
-
तसेच, फेस आयडी (iPhone X आणि नवीन मॉडेल्सवर उपलब्ध) काम करीत आहेत ना याची खात्री करून घ्या. आयफोन फेस आयडी नोंदणी करण्यात अयशस्वी झाल्यास, डिस्प्ले किंवा फेस आयडी सिस्टीममध्ये समस्या असू शकते. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. (फोटो सौजन्य: @Pixabay )
-
बॅटरी तपासा : प्रत्येक फोनसाठी बॅटरी ही आवश्यक असते. आयफोनच्या बॅटरी ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात चांगल्या स्थितीत असल्यास तो आयफोन विकत घेण्यास काहीच हरकत नाही; पण त्यापेक्षा त्या बॅटरीची क्षमता कमी असल्यास विचार करून निर्णय घ्या. (फोटो सौजन्य: indian express)
-
कॅमेरा सिस्टीम : बऱ्याच मॉडर्न आयफोन्समध्ये मागे किमान दोन कॅमेरे असतात; तर Pro iPhones मध्ये तीन कॅमेरे असतील. कॅमेरा ॲप उघडा आणि कॅमेऱ्याची सर्व फंक्शन्स अपेक्षेप्रमाणे काम करीत आहेत का याची खात्री करा. वापरलेल्या iPhone मधील कॅमेरे अबाधित असल्याची खात्री करण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा. (फोटो सौजन्य: The Indian express]
-
त्यामुळे ड्युप्लिकेट बॅटरी किंवा स्क्रीन असलेला आयफोन विकत घेणे टाळा. कारण- त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.. ( फोटो सौजन्य : Apple Hub / ट्विटर)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार