-
ब्राऊन मुंडे’ आणि ‘समर हाय’ आशा प्रसिद्ध गाण्यांचा गायक एपी ढिल्लन सध्या चर्चेत आहे. गायकाच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे.
-
एपी ढिल्लनच्या कॅनडातील व्हँकुव्हर येथील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. याबाबत चौकशी देखील सुरू झाली आहे.
-
लॉरेन्स बिश्नोई गँगमधील रोहित गोदाराने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. गोळीबारानंतर एपी ढिल्लनच्या संपत्तीबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.
-
एपी ढिल्लनच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
-
एपी ढिल्लनने २०१९ मध्ये आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. ‘फेक’ हा त्याचा पहिला सिंगल ट्रॅक होता.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एपी ढिल्लन एका परफॉर्मन्ससाठी सुमारे १० लाख रुपये घेतो.
-
पंजाबमधील एपी ढिल्लनच्या घराची किंमत कोटींमध्ये आहे. याशिवाय त्याचे कॅनडामध्येही आलिशन घर आहे.
-
एपी ढिल्लनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर तो सुमारे ८३ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.
-
एपी ढिल्लनचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३६ कोटी रुपये आहे. याशिवाय त्याकडे अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह देखील आहे. (सर्व फोटो: एपी ढिल्लन/इन्स्टाग्राम)
Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख