-
भारतात बरेच लोक जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲप्सचा उपयोग करतात. या डेटिंग अॅप्समुळे जोडीदार शोधणे खूपच सोपे झाले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, या ॲप्सवर तुमच्याशी बोलणारी प्रत्येक व्यक्ती खरी असते का? तर नाही… कारण अनेक जण अशा डेटिंग ॲप्सवर खोटे किंवा बनावट प्रोफाइल किंवा आयडी तयार करतात आणि तुमच्याकडून पैसे काढून घेण्याचाही प्रयत्न करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
यावर उपाय म्हणून अनेक प्रयत्न याआधीही करण्यात आले आहेत. पण, जोपर्यंत तुम्हाला ॲप्सवरील बनावट प्रोफाइल कसे ओळखायचे हे कळत नाही, तोपर्यंत ही समस्या कधीही संपणार नाही. तर डेटिंग ॲप्सवर बनावट प्रोफाइल शोधण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे आहेत… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर स्विच करणे : समोरची व्यक्ती तुमच्याशी डेटिंग ॲप्सवर बोलण्यास सुरुवात तर करते, पण हळूहळू संवाद वाढवून तुम्हाला दुसऱ्या ॲपवर स्विच होण्याससुद्धा सांगते. त्यासाठी तुमचा फोन नंबर, पत्ता इत्यादी वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जास्त चांगल्या प्रोफाइलपासून दूर राहा : काही व्यक्ती अशा असतात, जे तुमच्या भावना समजून घेण्यासाठी तुमच्याशी गोडगोड बोलतात. त्यामुळे असे प्रोफाइल्स वा आयडी तुम्हाला खऱ्या वाटू लागतात. तर अशावेळी तो प्रोफाइल बनावट आहे की नाही ओळखण्यासाठी ते सुरुवातीपासूनच तुमची काळजी घेणारे, तुमचा विचार करणारे आणि संरक्षण करणारे आहेत का हे एकदा नक्की तपासून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
भेटण टाळणे : जर डेटिंग ॲपवर एखाद्या व्यक्तीशी तुमचे प्रोफाइल जुळत असेल, पण ती व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर ते बनावट प्रोफाइल असू शकते. भेटण्यापेक्षा त्याला/तिला तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे आहे असे ती वारंवार कारण सांगताना दिसते; त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
प्लॅन्स वारंवार रद्द करणे : स्कॅमर सहसा तुम्ही बनवलेला एखादा प्लॅन टाळतात, तर कधी कधी तेच प्लॅन बनवतात आणि नंतर काही कारणांमुळे शेवटच्या क्षणी मुद्दाम रद्द करतात. तेव्हा तुम्हाला संशय आला पाहिजे की हा आयडी बनावट आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सतत आर्थिक मदत मागणे : हे कदाचित बनावट प्रोफाइलचे सर्वात मोठे लक्षण आहे. घोटाळेबाजांना सहसा आर्थिक फायदा मिळवायचा असतो. हे करण्यासाठी त्यांना शक्य तितक्या लवकर एखाद्याशी नाते जोडायचे असते. एकदा का आपण त्यांच्या जाळ्यात अडकलो की ते नंतर आपल्याकडे आर्थिक मदत मागण्यास सुरुवात करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सुरुवातीलाच वैयक्तिक प्रश्न विचारणे : काही जण अगदीच फ्रेंडली होऊन पत्ता , आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींबद्दल माहिती तुम्हाला विचारण्यास सुरुवात करतात, त्यामुळे तुम्ही अशा प्रोफाइलपासून वेळीच सावध व्हा. (फोटो सौजन्य: @Freepik)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार