-
दक्षिण भारतातील भगवान तिरुपती बालाजी मंदिर सध्या त्याच्या लाडूच्या प्रसादासाठी चर्चेत आहे. राज्यातील चंद्राबाबू नायडू सरकारने जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मंदिराच्या प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याचा आरोप केला आहे. तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं. मंदिराच्या एकूण संपत्तीबाबत जाणून घेऊया.
-
तिरुमला तिरुपती देवस्थानम नुसार २०२२ मध्ये श्री व्यंकटेश्वर स्वामींची एकूण संपत्ती २.५ लाख कोटी रुपये होती. दरवर्षी या संपत्तीमध्ये वाढ होतं असते.
-
२०२३ मध्ये, या मंदिराला १,०३१ किलो सोन्याचं दान मिळालं ज्याची किंमत सुमारे ७७३ कोटी रुपये आहे. तिरुपती ट्रस्टकडे एकूण ११,३२९ किलो सोनं आहे ज्याची किंमत सुमारे १८,४९६ कोटी रुपये आहे.
-
तिरुमला येथील भगवान बालाजीचे मंदिर वर्षाला १,४०० कोटी रुपयांची कमाई करतं तिरुपती बालाजी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रस्टने सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत विविध बँकांमध्ये सोनं जमा केलं आहे.
-
तिरुपती मंदिरात भरपूर सोनं दान केलं जातं. मंदिराशी संबंधित विविध ट्रस्टने एफडीच्या रूपात बँकांमध्ये १३,२८७ कोटी रुपये जमा केले आहेत, ज्यावर वार्षिक १६०० कोटी रुपयांचे व्याज मिळतं.
-
या वर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानाने ११६१ कोटी रुपयांची एफडी केली होती, जी गेल्या १२ वर्षांतील सर्वाधिक रक्कम असणारी आहे. प्रसादाच्या विक्रीतून ट्रस्टला सुमारे ६०० कोटी रुपये मिळतात. यासोबतच दर्शना तिकिटातून सुमारे ३३८ कोटी रुपये मिळतात.
-
काही काळापूर्वी मंदिराचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांनी भगवान बालाजीच्या संपत्तीबाबत खुलासा केला होता.
-
भगवान बालाजीच्या नावाने ११ हजार २२५ किलो सोनं विविध बँकांमध्ये जमा आहे.
९ -
(हे ही पाहा: Photos: ‘स्त्री-२’ ठरला भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट; यादीतील इतर बॉक्स ऑफिस हिट पाहा)

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO