-
जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कधी ना कधी मृत्यू होणार हे विधीलिखित आहे. मात्र, लोकसंख्येच्या दृष्टीने एखाद्या देशात वृद्धांची संख्या वाढणे नक्कीच चांगली बाब नाही, कारण घटता जन्मदर आणि वाढती वृद्धांची संख्या या कारणामुळे अनेक देश विविध समस्यांचा सामना करत आहेत.
-
कमावणाऱ्या हातांची संख्या कमी, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या जास्त झाल्यास देशाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असतो. अशाच काहीश्या समस्येचा सामना जगातील १० देश करत आहेत.
-
या देशांमध्येही तरुणांची संख्या कमी आणि वयोवृद्धांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्यामुळे हे देश आता जन्मदर वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, कोणत्या देशात वयोवृद्धांची झपाट्याने वाढ होतेय आपण जाणून घेऊ…
-
मोनॅकोमध्ये वृद्ध लोकांची सर्वाधिक टक्केवारी आहे. या देशातील ३६ टक्के लोकसंख्या ६५ किंवा त्याहून अधिक वयाची आहे, यामुळे या देशात आता वृद्धांचा सांभाळ करण्यासाठी अनेक वृद्धाश्रम आहेत; तर सरकारकडूनही या वृद्धांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
-
उच्च आयुर्मान आणि कमी जन्मदर यामुळे जपानमध्ये ६५ किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांची संख्या २८ टक्क्यांहून अधिक आहे. याच कारणामुळे जपान सध्या वयोवृद्ध लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जात आहे. जपानच्या वृद्ध लोकसंख्येत महिलांची संख्या अधिक आहे.
-
इटलीमध्येही सुमारे २४ टक्के लोकसंख्या ६५ किंवा त्याहून अधिक वयाची आहे. घटता जन्मदर आणि दीर्घ आयुष्यामुळे या देशातही वृद्धांची संख्या वाढतेय.
-
पोर्तुगालच्या लोकसंख्येपैकी अंदाजे २३ टक्के लोक ६५ आणि त्याहून अधिक वयोगटातील आहेत.
-
यानंतर ग्रीसमध्येही २३ टक्के लोकसंख्या ही ६५ किंवा त्याहून अधिक वयोगटातील आहे. ग्रीसनंतर जर्मनीतही सुमारे २२ टक्के लोक हे ६५ आणि त्याहून अधिक वयोगटातील आहेत.
-
यानंतर फिनलंडमध्ये एकूण लोकसंख्येच्या २२ टक्के लोक ६५ आणि त्याहून अधिक वयोगटातील आहेत. स्पेनमध्ये सुमारे २१ टक्के लोकसंख्या ६५ आणि त्याहून अधिक वयोगटातील आहे.
-
स्वीडनमध्ये एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोकसंख्या ६५ किंवा त्याहून अधिक वयोगटातील आहेत; तर फ्रान्समध्येही २१ टक्के लोक ६५ आणि त्याहून अधिक वयोगटातील आहेत.
-
दक्षिण कोरियातही वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या देशातही १७ टक्के लोक ६५ आणि त्याहून अधिक वयाचे आहेत. (photo credit – freepik)
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी