-
जगभरातील सरकारे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी लष्कराच्या बळावर विशेष लक्ष देतात. आजच्या काळात कोणत्याही देशासाठी अण्वस्त्रे खूप महत्त्वाची आहेत. जगातील अण्वस्त्रांची संख्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याचा सुरक्षा, शक्ती संतुलन आणि जागतिक राजकारणावर खोलवर परिणाम होतो. (Photo Source: Freepik AI)
-
सध्या अनेक देशांकडे अण्वस्त्रे आहेत, यावरून त्यांची लष्करी ताकद दिसून येते. शीतयुद्धानंतर अण्वस्त्रांचा साठा कमी करण्यात प्रगती झाली असली तरी जगात त्यांची संख्या अजूनही बरीच मोठी आहे. (Photo Source: Freepik AI)
-
2024 च्या सुरूवातीपर्यंतच्या माहितीनुसार 9 देशांकडे एकूण 12,121 अण्वस्त्रे आहेत, ज्याचा वापर क्षेपणास्त्रे, विमाने, जहाजे आणि पाणबुड्यांद्वारे केला जाऊ शकतो. यापैकी 9,585 शस्त्रास्त्रे लष्करी साठ्यात आहेत. (Photo Source: Freepik AI)
-
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI), फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (FAS) आणि इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लियर वेपन्स (ICAN) नुसार, जगातील सर्वात जास्त अण्वस्त्रे असलेले देश अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायल आहेत. (Photo Source: Freepik AI)
-
प्रत्येक देशाकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या ही गुप्त राष्ट्रीय माहिती असते. पण SIPRI, FAS आणि ICAN यांनी त्याची अंदाजे आकडेवारी सादर केली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देशाकडे किती शस्त्रे आहेत हे जाणून घेऊया. (Photo Source: Freepik AI)
-
रशियाकडे अंदाजे 5,500 अण्वस्त्रे आहेत. (Photo Source: Pexels)
-
युनायटेड स्टेट्सकडे अंदाजे 5,044 अण्वस्त्रे आहेत.
(Photo Source: Pexels) -
तसेच चीन या देशाकडे अंदाजे 500 अण्वस्त्रे आहेत. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक एआय)
-
तर फ्रान्सकडे 290 अण्वस्त्रे आहेत. (Photo Source: Pexels)
-
ब्रिटनकडे अंदाजीत 225 अण्वस्त्रे आहेत. (Photo Source: Freepik AI)
-
तर भारताकडे 172 अण्वस्त्रे आहेत. (Photo Source: Freepik AI)
-
पाकिस्तानकडे अंदाजे 170 अण्वस्त्रे आहेत. (Photo Source: Freepik AI)
-
तसेच इस्रायलकडे अंदाजे 90 अण्वस्त्रे आहेत. (Photo Source: Freepik AI)
हेही वाचा- जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य कोणत्या देशाचे आहे, टॉप १० मध्ये भारताचेही नाव, वाचा कितव्या स्थानी आहे इंडियन आर्मी?

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड