-
भारताची राजधानी असण्याव्यतिरिक्त, दिल्ली हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र देखील आहे. येथे असलेली अनेक संग्रहालये देशाचा इतिहास, कला, संस्कृती आणि वारसा दर्शवतात. तुम्ही दिल्लीत असाल, तर तुम्ही या ७ सर्वोत्तम संग्रहालयांना भेट देऊ शकता.
-
Crafts Museum | हस्तकला संग्रहालय
या ठिकाणी तुम्ही भारताच्या आदिवासी कला, वस्त्रोद्योग कारागीरी याचा थेट अनुभव घेऊ शकता, येथे पर्यटकांसाठी प्रात्यक्षिक सुद्धा ठेवलेले आहे.
स्थळ: भैरों मार्ग, प्रगती मैदान, नवी दिल्ली
(Photo Source: Nationalcraftsmuseum.nic.in) -
Dr. Ambedkar National Memorial | डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
हे संग्रहालय बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारे आहे.
स्थान: 26, अलीपूर रोड सिव्हिल लाईन्स असेंब्लीजवळ, नवी दिल्ली
(Photo Source: delhitourism.gov.in) -
Gandhi Smriti or Birla House | गांधी स्मृती बिर्ला हाऊस
हे तेच ठिकाण आहे जिथे महात्मा गांधींनी त्यांचे शेवटचे दिवस घालवले होते. येथे तुम्हाला त्यांचे जीवन आणि त्यांचे अद्भूत योगदान जाणून घेण्याची संधी मिळेल.
स्थान: 5 तीस जानेवारी मार्ग, राजघाट, नवी दिल्ली
(Photo Source: gandhismriti.gov.in) -
National Gallery of Modern Art | नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट
राजा रविवर्मा आणि अमृता शेर-गिल यांसारख्या आघाडीच्या कलाकारांच्या कलाकृतींसह हे आधुनिक भारतीय कलेचे संग्रहालय आहे.
स्थान: जयपूर हाऊस, शेरशाह रोड, नवी दिल्ली
(Photo Source: @ngma_delhi/twitter) -
Nehru Memorial Museum | नेहरू मेमोरियल म्युझियम
जवाहरलाल नेहरूंचे जीवन आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे संग्रहालय महत्त्वाचे ठिकाण आहे.
स्थान: तीन मूर्ती भवन, नवी दिल्ली
(Photo Source: pmsangrahalaya.gov.in) -
Rail Museum | रेल्वे संग्रहालय
रेल्वे संग्रहालय भारतीय रेल्वेच्या इतिहासाचे प्रदर्शन करते. येथे तुम्ही जुन्या रेल्वे गाड्या पाहू शकता आणि टॉय ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता.
ठिकाण: चाणक्यपुरी, नवी दिल्ली
(Photo Source: nrmindia.org) -
Shankar’s International Dolls Museum | शंकर आंतरराष्ट्रीय बाहुल्यांचे संग्रहालय
हे संग्रहालय विविध प्रकारच्या बाहुल्यांचा संग्रह सादर करते, हे लहान मुले आणि प्रौढ दोघांनाही एक अद्भुत अनुभव देते.
स्थळ: बहादूर शाह जफर मार्ग, विक्रम नगर, नवी दिल्ली
(Photo Source: delhitourism.travel)

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या ‘या’ कार्यक्रमाला माजी विश्वस्तांकडून विरोध; म्हणाल्या, “चुकीचा पायंडा…”