-
रतन टाटा हे भारतातील मोठे उद्योजक आहेत. अनेकदा समाजसेवेच्या भावनेने त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दान आणि सेवा केली आहे. रतन टाटा यांची एकूण संपत्ती अंदाजे ₹३ ,८०० कोटी आहे, तरीही फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश नाही आहे.
-
टाटा सन्सच्या नफ्यातील मोठा भाग आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण जीवनमान यासारख्या समाजाच्या विविध क्षेत्रांच्या सुधारणेसाठी काम करणाऱ्या अनेक ट्रस्टना दान केला जातो. यामुळे फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत रतन टाटा यांचे नाव जोडे जात नाही.
-
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रतिष्ठित ट्रस्ट चालवले जात आहेत. यामधील मुख्य ट्रस्टबद्दल जाणून घेऊया.
-
रतन टाटा यांच्या इच्छेनुसार १९१९ मध्ये ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली. ही भारतातील सर्वात जुनी अनुदान देणारी संस्था आहे, जी ग्रामीण जीवनमान, शिक्षण, आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देते.
-
नवाजबाई या टाटा सन्सच्या पहिल्या महिला संचालक होत्या, हा ट्रस्ट गरीब आणि गरजू लोकांचे जीवनमान सुधारण्याचे काम करतो.
-
‘टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या ट्रस्टची स्थापना २००८ मध्ये झाली. हे ट्रस्ट शिक्षणाद्वारे समाज कल्याण आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते. हे ट्रस्ट शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि समानता सुधारण्यासाठी कार्य करते.
-
‘बाई हिराबाई जेएन टाटा नवसारी चॅरिटेबल संस्था’ हा ट्रस्ट शिक्षण, आरोग्य सेवा आणि समाज कल्याणासाठी अनुदान देतो. जमशेटजी नुसरवानजी टाटा यांच्या पत्नीच्या सन्मानार्थ याची स्थापना करण्यात आली.
-
‘सार्वजनिक सेवा ट्रस्ट’ १९७५ मध्ये स्थापन झालेला हा ट्रस्ट लोकांना वैद्यकीय उपचारांच्या खर्चासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अनुदान देतो.
-
(फोटो स्रोत: रतन टाटा/इन्स्टाग्राम)
Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सर्वोच्च न्यायालयावर जाहीर टीका; म्हणाले, अनुच्छेद १४२ क्षेपणास्त्र बनलंय