-
सध्या इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव सतत वाढत आहे. इराणसाठी हा तणाव तोट्याचा सौदा ठरत आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद ज्या प्रकारे हमास आणि हिजबोलाच्या प्रमुखांना आणि शीर्ष कमांडरना निवडकपणे मारत आहे त्यामुळे इराणची ताकद कमकुवत होत आहे. इस्रायलला मध्यपूर्वेतील अनेक इस्लामिक देशांनी वेढले आहे, त्यातील अनेक देश त्याचे कट्टर शत्रू आहेत. एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये मध्य पूर्वेतील १० देशांबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये सैन्यांची आकडेवारीदेखील आहे. (Photo- Operation Inherent Resolve/Twitter)
-
हा अहवाल ग्लोबल फायरपॉवर 2024 (ग्लोबल फायरपॉवर, 2024) च्या हवाल्याने वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo- Operation Inherent Resolve/Twitter)
-
१०. लेबनॉन : सध्या, इस्रायली लष्कर लेबनॉनमध्ये ग्राउंड ऑपरेशन करत आहे आणि अनेक दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करत आहे. लेबनॉकडे १ लाख ६० हजार इतकी मिलिट्री फोर्स आहे. (Photo-@LebarmyOfficial/Twitter)
-
९. जॉर्डन: या अहवालानुसार जॉर्डनकडे २ लाख सैन्य आहे. (Photo- Jordan Armed Forces/Twitter)
-
८. UAE: इस्लामिक राष्ट्र असलेल्या UAE मध्ये एकूण सैन्याची संख्या २ लाख ७ हजार आहे. (Photo- @modgovae/Twitter)
-
७. सीरिया: इस्रायलच्या कट्टर शत्रूंपैकी एक असलेल्या सीरियाकडे २ लाख ७० इतके सैन्य आहे. (Photo- Syrian Democratic Forces/Twitter)
-
६. इराक: मध्यपूर्वेतील इस्लामिक देश इराकमध्ये २ लाख ९३ हजार सैन्य आहे. (Photo- Operation Inherent Resolve/Twitter)
-
५. सौदी अरेबिया: या देशाचे ४ लाख ७ हजार इतके सैन्य आहे. (Photo- @modgovksa/Twitter)
-
४. इस्रायल: ग्लोबल फायरपॉवर २०२४ च्या अहवालानुसार, इस्रायलकडे ६ लाख ६७ हजार सैन्य आहे ज्यात सक्रिय आणि राखीव सैन्याचा समावेश आहे. (Photo- Israel Defense Forces/Twitter)
-
३. तुर्की: इस्रायलच्या या शेजारी देशाच्या सैन्याची संख्या ८ लाख ८० हजार आहे. (Photo- Defence Turkey Magazine/Twitter)
-
२. इराण: या अहवालानुसार, इस्रायलचा कट्टर शत्रू इराणकडे ११ लाख सक्रिय आणि राखीव सैन्य आहे. (Photo- Iran Defense/Twitter)
-
१. इजिप्त: इजिप्तकडे मध्य पूर्वेतील सर्वात मोठे सैन्य आहे. या अहवालानुसार इजिप्तमध्ये १२ लाख सैन्य आहे. (Photo- Mahmoud Gamal/Twitter)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य