-
Tata Rroup Companies List : भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर आता टाटा समूहातील एका युगाचा अंत झाला आहे. रतन टाटा सुमारे ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांच्या जागी चेअरमन झाले.
-
त्यांच्या हाती टाटा कंपनीची धुरा आल्यापासून कंपनीने अनेक उंची गाठल्या आहेत. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील अनेक लहान मोठ्या कंपनी विकत घेतल्या,
-
यामुळे आज टाटा समूह हा देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने कोणत्या कंपन्या खरेदी केल्या जाणून घेऊ…
-
टेटली टी कंपनी – टाटा टीने २००० मध्ये ब्रिटीश चहा कंपनी टेटली ४५० दशलक्ष डॉलरला खरेदी केली. या खरेदीनंतर टाटा जगातील सर्वात मोठ्या चहा कंपन्यांपैकी एक बनली. भारतीय कंपनीने खरेदी केलेली ही पहिली विदेशी खरेदी होती, ज्यानंतर रतन टाटा यांच्या जागतिक विस्तार धोरणाचीही सुरुवात झाली.
-
देवू कमर्शियल व्हीकल – टाटा मोटर्सने दक्षिण कोरियातील देवू कमर्शियल व्हीकल युनिट १०२ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले. यामुळे जागतिक व्यावसायिक बाजारपेठेत टाटाचे स्थान मजबूत झाले. या खरेदीमुळे टाटाला ट्रक मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, ज्यामुळे टाटाला नव्या व्यावसायिक क्षेत्रात विस्तार करण्यात मदत झाली.
-
नॅटस्टील – टाटा समूहाची स्टील कंपनी टाटा स्टीलने सिंगापूरची स्टील कंपनी नॅटस्टीलची ४८६ डॉलरला खरेदी केली. यामुळे टाटा समूहाचे दक्षिणपूर्व आशियातील स्थान मजबूत झाले. जगभरात नव्याने उदयास येणाऱ्या बाजरपेठांमध्ये विस्तार करण्याच्या रतन टाटा यांच्या धोरणातील हा एक भाग होता
-
रिट्झ कार्लटन बोस्टन हॉटेल – टाटाची हॉटेल कंपनी ताज हॉटेल्सने २००६ मध्ये अमेरिकेची रिट्झ कार्लटन बोस्टन ही हॉटेल कंपनी सुमारे १७० दशलक्ष डॉलरला खरेदी केली, यामुळे ताज लक्झरी ब्रँडचा जागतिक स्तरावर विस्तार झाला. याद्वारे कंपनीने इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान मजबूत केले.
-
ब्रुनर मोंड – टाटा समूहाची केमिकल कंपनी टाटा केमिकल्सने यूके सोडा ॲश बनवणारी ब्रुनर मोंड ही कंपनी ९० दशलक्ष पौंडला विकत घेतली. या खरेदीद्वारे टाटा केमिकल्स सोडा ॲश बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनली.
-
कोरस स्टील खरेदी – २००७ मध्ये टाटा स्टीलने यूकेतील कोरस स्टील ही कंपनी १२९० दशलक्ष डॉलरला विकत घेतली, यावेळी कोणत्याही भारतीय कंपनीसाठी ही सर्वात मोठी डील होती. या करारानंतर टाटा स्टीलचा जगातील टॉप १० स्टील कंपन्यांमध्ये समावेश झाला.
-
जग्वार लँड रोव्हर – फोर्डकडून जग्वार लँड रोव्हरचे अधिग्रहण हा टाटा मोटर्ससाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा क्षण होता. या डीलची किंमत २३० कोटी डॉलर इतकी होती. सुरुवातीला अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण हा करार खूप यशस्वी ठरला आणि टाटा मोटर्स ऑटो क्षेत्रात जागतिक स्तरावरील प्रतिस्पर्धी कंपनी बनली, यामुळे ब्रिटीश लक्झरी ब्रँड्सना नवी उभारी मिळाली.
-
स्टारबग्स – टाटा ग्लोबल बेवरेजेसने भारतात स्टारबग्स आउटलेट सुरू करण्यासाठी यूएसच्या स्टारबग्सबरोबर संयुक्त प्रोजेक्टवर सही केली. या भागीदारीद्वारे टाटा समूहाने देशातील वेगाने वाढणाऱ्या कॉफी रिटेल मार्केटमध्ये प्रवेश केला.
-
बिगबास्केट – रतन टाटा यांनी २०१२ मध्ये सेवानिवृत्ती घेतली, परंतु ते टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिट्स राहिले. टाटा समूहाने मे २०२१ मध्ये बिग बास्केट विकत घेतले, त्यावेळी नटराजन चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष होते. टाटा डिजिटलने बिग बास्केटमधील मोठे भागभांडवल विकत घेतले, त्यामुळे टाटाचा ई कॉमर्स क्षेत्रात प्रवेश झाला.
-
एअर इंडिया – एअर इंडियाची सुरुवात जेआरडी टाटा यांनी केली होती, पण तिचे १९५३ मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. पण, काही वर्षांनंतर ही पुन्हा टाटाची कंपनी बनली. २०२२ मध्ये टाटा सन्सने १८ हजार कोटींना ही कंपनी विकत घेतली.
-
बीएसएनएल 4G डील- देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस (TCS) ही टाटा समूहाची आहे. याच कंपनीने गेल्या वर्षी २०२३ मध्ये बीएसएनएलचे देशव्यापी नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी २६,८२१ कोटी रुपयांचा करार जिंकला होता. हा करार बीएसएनएलला यशस्वी करता येईल असे प्रयत्न सुरू आहेत.
-
1MG – टाटा डिजिटलने 1MG कंपनीतील बहुतांश भागभांडवल विकत घेतले आहे. (Photo – indian express, financial express, tata groups websites, The Ritz-Carlton web, social media)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड