-
ज्याप्रमाणे दाऊद इब्राहिमच्या ‘डी कंपनी’ने मुंबईत दहशत पसरवली होती, त्याचप्रमाणे लॉरेन्स बिश्नोई टोळीनेही देशाच्या आर्थिक राजधानीत प्रवेश केला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळी चर्चेत आहे. टी-सीरीज म्युझिक कंपनीचे मालक गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्याच पद्धतीने या टोळीने सिद्दीकींचा खून केला आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
गेली दोन दशके मुंबई शांत होती. ना कुठलं टोळीयुद्ध ना रक्तपात पण आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईने राज्य सरकार आणि प्रशासनाची झोप उडवली आहे. लॉरेन्स बिश्नोईला मुंबईतील रिकाम्या झालेल्या माफिया खुर्चीवर बसायचे होते असे दिसते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईवर अनेक माफियांचे राज्य होते. एकाला डॅडी ऑफ बॉम्बे असेही म्हटले जायचे. चला जाणून घेऊया कोण होते हे मुंबईचे माफिया? (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
हाजी मस्तान
हाजी मस्तान हा मुंबईचा पहिला अंडरवर्ल्ड डॉन मानला जातो. ७० च्या दशकात मस्तानने मुंबईत आपली पकड मजबूत केली होती. हाजी मस्तानने तस्करीच्या माध्यमातून भरपूर पैसा कमावला होता. हाजी मस्तानला पांढरा डिझायनर सूट घालण्याचा आणि मर्सिडीज कार चालवण्याचा शौक होता. हाजी मस्तानचा चित्रपटसृष्टीतही मोठा प्रभाव होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
करीम लाला
मुंबईतील तस्करीसह अनेक अवैध धंद्यांमध्ये करीम लालाचा हात होता. करीम लाला हा पठाण होता जो अफगाणिस्तानातून मुंबईत आला होता आणि इथे त्याने तस्करीच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. करीम लालाचे हाजी मस्तानशी चांगले संबंध होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
वरदराजन मुदलियार
वरदराजन मुदलियार मद्रासहून मुंबईत आला तेव्हा त्यांनं व्हीटी स्टेशनवर कुली म्हणून काम केलं. येथेच तो दारूच्या व्यवसायात अडकला. हे १९६० चे दशक होते जेव्हा हाजी मस्तान आणि करीम लाला यांनी मुंबईवर राज्य केले होते. अवैध धंद्यात मुददलियारचा हात वाढत गेला आणि मग एके दिवशी तो हाजी मस्तानला भेटला. अशा स्थितीत मुंबईतील तिघांसाठी तीन क्षेत्रे विभागली गेली, जिथे ते एकमेकांच्या क्षेत्रात जाणार नाहीत हे त्यांचे ठरले होते. तोपर्यंत मुंबईत रक्तपात झाला नव्हता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
दाऊद इब्राहिम
दाऊद इब्राहिम हा भारतातील सर्वात मोठा अंडरवर्ल्ड डॉन मानला जातो. दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. या हल्ल्यापूर्वी तो दुबईला पळून गेला होता. दाऊद इब्राहिमबाबत असे अनेक अहवाल आणि चित्रे समोर आली आहेत ज्यावरून असे दिसून येते की पाकिस्तानने त्याला कराचीमध्ये आश्रय दिला आहे. दाऊद इब्राहिम हे तस्करीच्या आणि माफियांच्या जगातील एक मोठे नाव आहे. मुंबईत एक वेळ आली जेव्हा डी कंपनीने करीम लाला आणि हाजी मस्तानला संपवले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
शब्बीर इब्राहिम कासकर
शब्बीर इब्राहिम कासकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मोठा भाऊ होता. दोघांनी मिळून डी कंपनी सुरू केली. शब्बीर इब्राहिमच्या हत्येनंतर मुंबईत टोळीयुद्ध सुरू झाले. शब्बीरची हत्या करीम लालानेच घडवून आणल्याचे सांगितले जाते. यानंतर दोघांमध्ये जोरदार टोळीयुद्ध सुरू झाले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
अरुण गवळी
दाऊद इब्राहिमने मुंबई सोडल्यानंतर आता गुन्हेगारी क्षेत्रात दोन माफिया उरले होते, एक अरुण गवळी आणि दुसरा अमर नाईक. अमर नाईकला पोलिसांनी चकमकीत मारले, त्यानंतर फक्त अरुण गवळी उरला. पांढरी टोपी आणि कुर्ता परिधान केलेला अरुण गवळी मुंबईच्या दगडी चाळमध्ये राहत होता जो त्याचा गड मानला जायचा. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
डॅडी म्हणून प्रसिद्ध
गवळीला सुपारी किंगही म्हटले जायचे. मुंबईत अरुण गवळी डॅडी म्हणून प्रसिद्ध होता. गवळी सध्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गवळीने राजकारणातही प्रवेश केला आणि २००५ मध्ये अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष स्थापन केला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार उभे केले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
कारागृहात जाताच पोलिसांनी या टोळीचा खात्मा केला
आमदार झाल्यानंतर गवळीने २००८ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची सुपारी देऊन हत्या केली, त्यानंतर पोलिसांनी गवळीला तुरुंगात टाकले आणि चकमकीत गवळीची संपूर्ण टोळी उद्ध्वस्त केली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
अबू सालेम
अबू सालेम हा देखील मुंबईतील बड्या माफियांपैकी एक आहे. सध्या अबू सालेम मुंबई तुरुंगात आहे. अबू सालेम ८० च्या दशकात मुंबईत आला, त्यानंतर तो दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीत सामील झाला आणि लवकरच गुन्हेगारी जगतात मोठे नाव बनले. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही अबू सालेमचा हात होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
बडा राजन
राजन महादेव नायर जो बडा राजन म्हणून प्रसिद्ध होता. ७०-८० च्या दशकात मुंबईतील बड्या माफियांपैकी एक असलेला बडा राजन सुरुवातीला चित्रपटाच्या तिकिटांचा काळाबाजार करायचा. नंतर छोटा राजनला भेटल्यावर दोघांनी मिळून तिकीट ब्लॅक करून विकण्याचा धंदा मोठा केला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
छोटा राजन
छोटा राजन हा एकेकाळी दाऊद इब्राहिमचा उजवा हात होता. मात्र काही काळानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर कट्टर वैरात झाले. छोटा राजनला २०१५ मध्ये बाली, इंडोनेशिया येथून अटक करून नंतर भारतात आणण्यात आले. सध्या त्याला दिल्लीतील तिहार तुरुंगातील सर्वोच्च सुरक्षा तुरुंग क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
छोटा शकील
छोटा शकील हा दाऊद इब्राहिमचा खास व्यक्ती मानला जातो. पाकिस्तानने छोटा शकीलला आश्रय दिला आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये छोटा शकील पाकिस्तानच्या संरक्षण क्षेत्र कराचीमध्ये राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. छोटा शकील हा मुंबई बॉम्बस्फोटातील एक आरोपी असून भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत त्याचा समावेश आहे. छोटा शकीलवर हवाला, खंडणी, अपहरण, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि बॉम्बस्फोट असे डझनभर गुन्हे दाखल आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
हेही वाचा- बाबा सिद्दीकी होते कोट्यधीश; मुंबई, राजस्थान ते UAE मधील तब्बल ‘इतकी’ मालमत्ता सोडली मागे!
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ