-
भारतातील YouTube क्रिएटर्ससाठी कर नियम आणि ITR भरण्यासंदर्भात काही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत, ज्या सर्व युट्यूबर्ससाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (Photo: Pexels)
-
१) आयकर नियम
भारतातील आयकर नियम सर्व करदात्यांसाठी समान आहेत, मग ते नोकरदार असोत किंवा फ्रीलांसर असोत. कृषी उत्पन्न वगळता, इतर सर्वांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. (Photo: Pexels) -
२) जुन्या कर प्रणालीचे प्रयोजन
सध्याच्या कर प्रणालीनुसार, जुन्या कर प्रणालीमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नव्हता, तर नवीन कर प्रणालीमध्ये ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आले आहे. (Photo: Pexels) -
कर प्रणाली निवडताना, यूट्यूबर्सना त्यांच्या उत्पन्न किती आणि खर्च किती आहेत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. या आधारावर ते कर भरण्याच्या प्रक्रियेत सामाविष्ट होतील. (Photo: Pexels)
-
३) ITR-1 किंवा ITR-2 फॉर्म काय असतो?
YouTube यूट्यूबर्सना ITR-1 किंवा ITR-2 फॉर्म वापरण्याची गरज नाही. कारण त्यांच्या कमाईचा पगार म्हणून विचार केला जात नाही. त्यांचे उत्पन्न फ्रीलांसर किंवा व्यवसाय म्हणून मानले जाते, ज्यासाठी त्यांनी ITR-3 आणि ITR-4 हा फॉर्म भरणं अपेक्षित आहे. (Photo: Pexels) -
४) ITR-3 आणि ITR-4
ITR-3 हा फॉर्म अशा क्रिएटर्ससाठी आहे ज्यांचे उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, जर क्रिएटरने अनुमानित कर भरणा योजनेची निवड केली असेल, तर तो ITR-4 फॉर्म वापरू शकतो. (Photo: Pexels) -
ही प्रक्रिया अशा क्रिएटर्ससाठी आहे ज्यांचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा कमी आहे. यामुळे बॅलेंस शीटमधील गुंतागुंतीपासून वाचता येते. (Photo: Pexels)
-
५) हे खर्च समाविष्ट करता येतील
युट्यूबर्स त्यांच्या व्यावसायिक खर्चावर आधारित कर कपातीचा दावा करू शकतात. यामध्ये व्हिडिओ प्रॉडक्शन, एडिटिंग, मार्केटिंंग आणि इतर संबंधित खर्च समाविष्ट असू शकतात. (Photo: Pexels) -
यामुळे त्यांचे करपात्र उत्पन्न कमी होईल. तसेच कमी कर भरावा लागेल. दरम्यान, नोकरदार कर्मचाऱ्यांप्रमाणे, क्रिएटर्स ५० हजार रूपयांच्या मानक कपातीचा लाभ घेऊ शकत नाहीत. (Photo: Pexels)
-
६) या तथ्यांच्या आधारे विभागणी होते
आयकर विभाग YouTube क्रिएटर्सच्या उत्पन्नाची त्यांच्या क्रियाकलापांच्या आधारावर विभागणी करतो. जर एखादे चॅनेल नोंदणीकृत व्यवसाय म्हणून चालवले जात असेल तर ते व्यवसायाचे उत्पन्न मानले जाते. (Photo: Pexels) -
त्याच वेळी, जर चॅनल केवळ मनोरंजन किंवा छंद म्हणून चालवले जात असेल आणि त्यातून उत्पन्न मिळत असेल तर ते ‘इतर स्त्रोतां’च्या उत्पन्नात ठेवले जाते. (Photo: Pexels)
-
(Photo: Pexels)
हेही वाचा- कॅनडामधील सर्वात धनाढ्य भारतीय; रिअल इस्टेटचा ‘किंग’ अशी ओळख, वाचा मालमत्तेची माहिती…

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”