-
पुढील वर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये कॅनडात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची लोकप्रियता सातत्याने घसरत आहे. (Photo: PTI)
-
यासोबतच कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंधही सातत्याने बिघडत आहेत.आणि याचे कारण आहे जस्टिन ट्रुडो यांचे वादग्रस्त विधान. शीख फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. (Photo: PTI)
-
दरम्यान, भारताने कॅनडातून भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. भारताने कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांनाही देशातून बाहेर काढले आहे. कॅनडात शिखांचे खूप वर्चस्व आहे आणि देशाच्या राजकारणातही त्यांचा प्रभाव जोरदार आहे. पण सध्या कॅनडात शिखांची लोकसंख्या किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? (Photo: PTI)
-
२०१५ मध्ये, जेव्हा जस्टिन ट्रूडो पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी चार शीखांचा त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश केला आणि कॅनडाच्या राजकारणाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी ट्रुडो यांनी गंमतीने असेही म्हटले होते की, भारतातील मोदी सरकारपेक्षा त्यांच्या मंत्रिमंडळात शीख मंत्री जास्त आहेत. कॅनडाच्या संसदेत सध्या १९ भारतीय वंशाचे लोक आहेत. यासोबतच तीन सदस्य कॅबिनेट मंत्रीही आहेत. (Photo: Reuters)
-
२०१६ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, अल्पसंख्याक कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या २२.०३ टक्के झाले होते आणि त्यांची संख्या १९८१ मध्ये एकूण लोकसंख्येच्या केवळ ४.७ टक्के होती. (Photo: Indian Express)
-
यासोबतच एका अहवालात म्हटले आहे की २०३६ पर्यंत कॅनडातील अल्पसंख्याकांची लोकसंख्या ३३ टक्क्यांवर पोहोचेल. (Photo: Indian Express)
-
संपूर्ण जगात सर्वाधिक भारतीय कॅनडामध्ये राहतात. कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण ४ टक्के आहे. यासह शीख धर्म हा कॅनडातील चौथा सर्वात मोठा धार्मिक समूह आहे. (Photo: Indian Express)
-
कॅनडात सुमारे ८ लाख शीख अनुयायी आहेत. त्याच वेळी, २०२१ पर्यंत, कॅनडात शिखांची लोकसंख्या २.१ टक्के होती. (Photo: Indian Express)
-
कॅनडात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या १६ लाखांहून अधिक आहे. (Photo: Indian Express) हेही पाहा –कॅनडामधील सर्वात धनाढ्य भारतीय; रिअल इस्टेटचा ‘किंग’ अशी ओळख, वाचा मालमत्तेची माहिती
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला १०० वर्षांनंतर दुर्मीळ राजयोग; या राशींना मिळणार धनलाभ, करिअरमध्ये यश अन् व्यवसायात दुप्पट नफा