-
मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे, परंतु असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची प्रसिद्धी आणि कमाई त्यांच्या मृत्यूनंतरही कायम आहे. मग ते त्यांचे संगीत अल्बम, पुस्तके, चित्रपट किंवा लायसन्सिंग आणि मर्चेंडाइजिंगमधून असो, हे सेलिब्रिटी करोडो आणि अब्जावधी कमावत आहेत. फोर्ब्सने २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मृत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये पॉप किंग मायकेल जॅक्सन पुन्हा एकदा सर्वात वर आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या कमाईवर एक नजर टाकूया. (Express archive photo)
-
MICHAEL JACKSON
जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकेल जॅक्सनचे २५ जून २००९ रोजी प्रोपोफोल आणि बेंझोडायझेपाइन सारख्या हेवी औषधांच्या ओव्हरडोजमुळे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र त्याच्या मृत्यूनंतरही तो भरघोस कमाई करत आहे. २०२३ मध्ये जॅक्सनची कमाई ११५ दशलक्ष डॉलर्स आहे. (Express archive photo) -
ELVIS PRESLEY
रॉक अँड रोलचे किंग, एल्विस प्रेस्ली यांचे १६ ऑगस्ट १९७७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र आजही त्यांच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही. त्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा मेम्फिस, टेनेसी येथे असलेल्या त्याच्या ग्रेसलँडच्या हवेलीतील तिकीट विक्री आणि व्यापारातून येतो. एल्विसने २०२३ मध्ये १०० दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत. (Express archive photo) -
RAY MANZAREK
डोअर्सचा कीबोर्ड प्लेयर रे मांझारेक याचे २० मे २०१३ रोजी कर्करोगाने निधन झाले. २०२३ मध्ये, त्याचा संगीत कॅटलॉग करार, बँडच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग अधिकार आणि ट्रेडमार्कची विक्रीतून त्याने ४५ दशलक्ष डॉलर्स कमावले. (Express archive photo) -
DR. SEUSS
प्रसिद्ध लेखक आणि चित्रकार डॉ. सिअस यांचे २४ सप्टेंबर १९९१ रोजी कर्करोगाने निधन झाले, परंतु त्यांची पुस्तके आजही मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांची पुस्तके आजही बेस्ट सेलर यादीत आहेत. २०२३ मध्ये, कंपनीने पुस्तक विक्रीतून आणि त्याच्या क्लासिक पुस्तकातील पात्रांच्या (‘द ग्रिंच’, ‘कॅट इन द हॅट’ आणि ‘लॉरॅक्स’) लायसन्सिंगमधून ४० दशलक्ष डॉलर्स कमावले. (Express archive photo) -
CHARLES M. SCHULZ
‘पीनट’, ‘चार्ली ब्राउन’ आणि ‘स्नूपी’ यांसारख्या पात्रांचे निर्माते चार्ल्स एम. शुल्झ यांचे १२ फेब्रुवारी २००० रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या या सर्व कॅटलॉगमधून दरवर्षी करोडो रुपयांची कमाई होते. २०२३ मध्ये त्यांची कमाई ३० दशलक्ष डॉलर्स होती. Apple TV+ आणि स्नूपी मर्चेंडाईज वरील त्यांचे खास शो त्यांच्या कमाईचा भाग आहेत. (Express archive photo) -
PRINCE
प्रसिद्ध गायक प्रिन्सचा २१ एप्रिल २०१६ रोजी शक्तिशाली ओपिओइड फेंटॅनाइलच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाला. तथापि, त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे तीन अल्बम रिलीज झाले ज्यामुळे ते आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. त्यांचा संगीत कॅटलॉग अजूनही लोकप्रिय आहे. २०२२३ मध्ये त्यांनी ३० दशलक्ष डॉलर्स कमावले होते. (Express archive photo) -
WHITNEY HOUSTON
संगीत जगतात अगणित हिट गाणी देणारी अमेरिकन गायिका व्हिटनी ह्यूस्टन हिचा ११ फेब्रुवारी २०१२ रोजी हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या जीवनावर आधारित ‘आय वाना डान्स विथ समबडी’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात सुमारे ६० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. त्याच वेळी, MAC कॉस्मेटिक्ससह तिचे मेकअप कलेक्शन आणि इतर ब्रँड्ससह सहयोग हे देखील तिच्या कमाईचे प्रमुख स्त्रोत आहेत. २०२३ मध्ये तिने ३० दशलक्ष डॉलर्स कमावले होते. (Express archive photo) -
JOHN LENNON
‘बीटल्स’ सदस्य जॉन लेनन यांची त्याच्या मॅनहॅटन अपार्टमेंट इमारतीसमोर ८ डिसेंबर १९८० रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. २०२३ मध्ये त्यांची कमाई २२ दशलक्ष डॉलर्स होती. त्यांची कमाई त्याच्या वैयक्तिक संगीत कॅटलॉग आणि ‘द बीटल्स’ च्या संगीतातून येते. (Express archive photo) -
BOB MARLEY
रेगे म्युझिक आयकॉन बॉब मार्ले यांचे ११ मे १९८१ रोजी कर्करोगामुळे निधन झाले. त्यांनी २०२३ मध्ये १६ दशलक्ष डॉलर्स कमावले, ज्यात त्यांच्या संगीताची विक्री आणि हेडफोन आणि कॅनबिस यांसारख्या ब्रँडेड उत्पादनांचा समावेश आहे. (Express archive photo) -
BING CROSBY
१४ ऑक्टोबर १९७७ रोजी बिंग क्रॉसबी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. क्रॉसबीची ख्रिसमस गाणी अजूनही त्यांच्या कमाईचा एक मोठा भाग आहेत. (Express archive photo) -
GEORGE HARRISON
बीटल्सचे आणखी एक सदस्य जॉर्ज हॅरिसन यांचे २९नोव्हेंबर २००१ रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांनी २०२३ मध्ये १४ दशलक्ष डॉलर्स कमावले, ज्यात त्यांच्या संगीत कॅटलॉगमधील उत्पन्नाचा समावेश आहे. (Express archive photo) -
ARNOLD PALMER
२५ सप्टेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध गोल्फर अर्नोल्ड पामर यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी २०२३ मध्ये १० दशलक्ष डॉलर्स कमावले, ज्यात त्यांच्या सिग्निचर बेव्हरेज ब्रँडच्या विक्रीचाही समावेश आहे. (Express archive photo) -
MARILYN MONROE
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोचा बार्बिट्युरेटच्या ओव्हरडोजमुळे ५ ऑगस्ट १९६२ रोजी मृत्यू झाला. २०२३ मध्ये तिची कमाई १० दशलक्ष डॉलर्स होती. विविध फॅशन आणि ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये तिचा फोटो आणि नाव वापरले जात आहे. (Express archive photo)
हेही वाचा – ‘या’ अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी जमली होती लाखोंची गर्दी, सरकारला चालवाव्या लागल्य…

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”