-
प्रियांका गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत आई सोनिया गांधीही उपस्थित होत्या. (Photo: PTI)
-
सोनिया गांधींशिवाय प्रियांका गांधी यांचे भाऊ आणि काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. (Photo: PTI)
-
वायनाडहून उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेल्या प्रियंका गांधी साडीमध्ये दिसल्या, ज्यात त्यांचा साधा लूक दिसत होता. (Photo: PTI)
-
जांभळ्या रंगाच्या या साडीमध्ये प्रियंका गांधी खूपच सुंदर दिसत आहेत. लाल रंगाची लिपस्टिक आणि हलका मेकअप त्यांना खूप शोभतोय. (Photo: PTI)
-
राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती पण नंतर त्यांनी ही जागा सोडली, त्यानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. (Photo: PTI)
-
प्रियांका गांधी वाड्रा यांनी नामांकनादरम्यान आपली संपत्ती जाहीर केली. (Photo: PTI)
-
प्रतिज्ञापत्रात प्रियांका गांधी यांनी ४ कोटी २४ लाख रुपयांची जंगम संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्याकडे ५२ हजार रुपये रोख आहेत. (Photo: PTI)
-
यासोबतच प्रियंका गांधी यांनी म्युच्युअल फंडात २ कोटी २४ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. ३ लाख ६० हजार रुपये बँक खात्यात जमा आहेत. त्याच वेळी, पीपीएफ खात्यात १७ लाख ३८ हजार रुपये जमा आहेत. (Photo: PTI)
-
प्रियंका गांधी यांच्याकडे एक होंडा सीआरव्ही कार आहे ज्याची किंमत ८ लाख रुपये आहे, जी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी भेट दिली आहे. (Photo: PTI)
-
याशिवाय प्रियांका गांधी वाड्रा यांच्याकडे १ कोटी १५ लाख रुपयांचे सोने आणि २९ लाख रुपयांची चांदी आहे. (Photo: PTI)
हेही पाहा –Photos : ‘मी कोथरूडचा कोथरूड माझं’, महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांची अर्ज दाखल…
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश