-
भारतीय उद्योगपती रतन टाटा यांनी ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी दोन दशके टाटा समूहाचे नेतृत्व केले. त्यांच्या निधनाने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांपासून ते चित्रपट कलाकार, नेते, खेळाडूंपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला. (Photo: Indian Express)
-
रतन टाटा जितके श्रीमंत होते तितकेच त्यांचे जीवनही साधे होते. इतके श्रीमंत असूनही एकदा अमिताभ बच्चन यांच्याकडे त्यांनी पैसे उसने मागितले होते. याशिवाय एकदा त्यांनी लिफ्टही मागितली होती. चला याबद्दल जाणून घेऊ. (Photo: Amitabh Bachchan/Insta)
-
वास्तविक, शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती १६’ या शोमध्ये रतन टाटा यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवताना हा किस्सा शेअर केला आहे. बिग बींनी बोमन इराणी आणि फराह खान यांच्यासमोर हा किस्सा सांगितला. (Photo: Amitabh Bachchan/Insta)
-
एकदा अमिताभ बच्चन लंडनला जात होते आणि त्याच फ्लाइटमध्ये रतन टाटाही बसले होते. दोघेही लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरले. पण जे लोक रतन टाटा यांना घ्यायला येणार होते ते तिथे आले नाहीत किंवा त्यांना ते कुठेच दिसले नाहीत. (Photo: Indian Express)
-
तिथे अमिताभ बच्चनही उभे होते. यानंतर रतन टाटा फोन करण्यासाठी फोन बूथवर गेले. त्यावेळी रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांना जे सांगितले ते अभिनेते कधीही विसरू शकत नाहीत. असं मत बच्चन यांनी व्यक्त केले. (Photo: Indian Express)
-
तर झाले असे की काही वेळाने, रतन टाटा अमिताभ बच्चन यांच्याकडे येतात आणि त्यांना फोन कॉल करण्यासाठी पैसे देण्यास सांगतात. रतन टाटांसारखा मोठा उद्योगपती इतका साधेपणाने वागला हे ऐकून अमिताभ बच्चन आश्चर्यचकित झाले होते. (Photo: Indian Express)
-
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी रतन टाटा यांच्याशी संबंधित आणखी एक घटना शेअर केली की, एवढा मोठा उद्योगपती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या एका मित्राकडून लिफ्ट मागितली होती. (Photo: Indian Express)
-
वास्तविक, त्यांचा एक मित्र अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका कार्यक्रमाला गेला होता, जिथे रतन टाटाही उपस्थित होते. रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांच्या मित्राला लिफ्ट मागितली होती आणि त्यांच्याकडे कार नसल्याने घरी सोडणार का असे विचारले होते. रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांच्या मित्राला हेदेखील सांगितले की ते त्यांच्या घराच्या मागे राहतात. (Photo: Indian Express)
-
रतन टाटा यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक कथा आहेत ज्या आज जगाच्या स्मरणात आहेत. हे रतन टाटा होते, ज्यांच्यामुळे टाटा समूहाने केवळ देशातच नव्हे तर जगभरातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वेगळी छाप सोडली. (Photo: Indian Express)
हेही वाचा – दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांमध्ये तुमचं मनोरंजन करण्यासाठी ‘या’ १५ वेब सिरीज-चित्रपट OTT वर प्रदर्शित होत आहेत

दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?