-
केवळ भारतातच नाही तर जगात अशी अनेक शहरं आहेत ज्यांच्या निर्मितीच्या अनेक कथा असतात. शहरांच्या नावांमागेही काही कथा असतात. अनेक शहरं त्यांच्या जीवनशैली, संस्कृती आणि व्यापारामुळे वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
देशात असेच एक शहर आहे जे ‘सिटी ऑफ ब्लॅक डायमंड’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे कोणते शहर आहे आणि त्याला असे का म्हणतात ते जाणून घेऊया (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान, झारखंडमधील धनबाद शहराला ‘City Of Black Diamond’ म्हटले जाते. या शहरातील अनेक परिसरात कोळशाचे प्रचंड साठे आणि अनेक कोळशाच्या खाणी असल्यामुळे त्याला या नावाने ओळखले जाते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील आसनसोल या शहराला काळ्या हिऱ्यांची भूमी म्हटले जाते. हे शहर भारतातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादकांपैकी एक आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
यासोबतच झारखंडचे धनबाद ही भारताची कोळशाची राजधानी म्हणूनही ओळखली जाते जी जगभरात प्रसिद्ध आहे. कोळशाशिवाय अनेक प्रकारची खनिजेही येथील खाणींमध्ये आढळतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा उत्पादक आणि ग्राहकही आहे. त्याचबरोबर भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे कोळशाचे साठे आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
झारखंड व्यतिरिक्त ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातही कोळसा मिळतो. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
भारतातील कोळसा उत्पादन हे देशातील ऊर्जा क्षेत्र आणि औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
दामोदर नदीच्या पश्चिमेला असलेल्या राणीगंज कोलफिल्डमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने १७७४ मध्ये याची सुरुवात केली होती. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
हेही पाहा – रतन टाटांकडे नव्हते पैसे, अमिताभ बच्चन यांच्या मित्राला घरी जाण्यासाठी मागितली होती लिफ्ट

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा