-
जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे एक सुप्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती तसेच जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. (Photo Source: Reuters)
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत, डोनाल्ड ट्रम्प यांनी किती वेळा लग्न केले आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया: (Photo Source: Reuters)
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वेळा लग्न केले आहे. त्यांची तिसरी पत्नी मेलानिया ट्रम्प आहे, मेलानिया यांना पाहून पहिल्या नजरेतच डोनाल्ड यांना त्यांच्यावर प्रेम झाले होते. दरम्यान तीन पत्नींपासून ट्रम्प यांना पाच मुले आहेत. ट्रम्प यांचे पहिले लग्न १९७७ मध्ये इव्हाना मेरी ट्रम्प यांच्याबरोबर झाले होते. दोघांची पहिली भेट १९७६ मध्ये एका हॉटेलमध्ये झाली होती. इव्हाना आधीच विवाहित होत्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांना भेटल्यानंतर त्यांनी पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. (Photo Source: Reuters)
-
ट्रम्प यांचे हे लग्न जवळपास १३ वर्षे टिकले आणि त्यानंतर १९९० मध्ये दोघे वेगळे झाले. इव्हाना यांचे २०२२ मध्ये निधन झाले.
डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची पहिली पत्नी इव्हानापासून डोनाल्ड ट्रम्प जूनियर, इवांका ट्रम्प आणि एरिक ट्रम्प अशी तीन मुले होती.
डोनाल्ड ट्रम्पपासून विभक्त झाल्यानंतर इव्हानाने आणखी तीन लग्ने केली होती परंतु त्यापैकी एकही लग्न टिकले नाही. (Photo Source: Reuters) -
डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी पत्नी अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका मारला मॅपल्स होती. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाच्या दरम्यानच त्यांच्या अफेअरच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यानंतर त्यांच्या रोमान्सची छायाचित्रे टॅब्लॉइड्समध्ये प्रसिद्ध झाली, त्यानंतर ते दोघेही चर्चेत राहिले. (Photo Source: Reuters)
-
डोनाल्ड आणि मार्ला यांनी १९९३ मध्ये एकमेकांशी लग्न केले. पण हे नातंही फक्त चार वर्षं टिकलं आणि त्यानंतर १९९९ मध्ये दोघेही वेगळे झाले. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची दुसरी पत्नी मारलापासून एक मुलगी होती, तिचे नाव टिफनी ट्रम्प आहे. (Photo Source: Reuters)
-
मार्लापासून घटस्फोट घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प बराच काळ अविवाहित राहिले. एके दिवशी डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क फॅशन वीकच्या पार्टीला गेले होते तिथे त्यांची मेलानिया यांच्याशी भेट झाली. मेलानिया या पॅरिस आणि मिलानच्या फॅशन जगतातील प्रसिद्ध मॉडेल्सपैकी एक होत्या आणि त्या काळात त्यांच्या सौंदर्याची खूप चर्चा होती. (Photo Source: Reuters)
-
मेलानियासोबतच्या पहिल्या भेटीत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या प्रेमात पडले आणि भेटीच्या ५ मिनिटांतच ट्रम्प यांनी त्यांना फोन नंबरही मागितला. त्यावेळी मेलानिया २८ वर्षांच्या होत्या आणि ट्रम्प ५२ वर्षांचे होते. यानंतर दोघांमध्ये चर्चा आणि भेटीगाठी सुरू झाल्या. (Photo Source: Reuters)
-
१९९९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, यावेळी दोघांमध्ये काही काळासाठी ब्रेकअपही झाले आणि ट्रम्प पुन्हा एकदा सिंगल राहू लागले. (Photo Source: Reuters)
-
२००० मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाले तेव्हा काही महिन्यांनंतर मेलानिया आणि ते पुन्हा एकत्र दिसले. पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानिया यांना सुमारे १.५ दशलक्ष डॉलर किंमतीची हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज केले, त्यानंतर दोघांनी २००५ मध्ये लग्न केले. या लग्नापासून ट्रम्प यांना बॅरन ट्रम्प नावाचा मुलगा आहे. (Photo Source: Reuters)
हेही पाहा- Photos : नोरा फतेहीचा हा लूक तुम्हाला कसा वाटला, ‘या’ आउटफिटमध्ये दिसतेय खूपच हॉट

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”