-
बांगलादेशात सध्या परिस्थिती चांगली नाही. सत्ताबदलानंतर शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. सध्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारची कमान मोहम्मद युनूस यांच्या हाती आहे. भारताच्या या शेजारी देशात सरकार बदलल्यापासून रोज हिंदूंचा छळ होत आहे. परिस्थिती अशी आहे की बांगलादेशातील हिंदू आता भारतात आश्रय घेत आहेत. (Photo Source: Indian Express)
-
बांगलादेश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंधही खूप खोल आहेत. दोन्ही देश एकमेकांना अनेक वस्तूंची आयात आणि निर्यात करतात. (Photo Source: Pexels)
-
पण बांगलादेशातील लोक भारतातील कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? (Photo Source: Pexels)
-
रॉ कॉटन (कच्चा कापूस) : बांगलादेश बहुतेक कच्चा कापूस आणि त्याचा कचरा (वेस्टेज) भारताकडून खरेदी करतो. २०२१- २०२२ मध्ये दोन्ही देशांदरम्यान सुमारे १६४.२० दशलक्ष डॉलर्स किमतीचा कापूस निर्यात झाला. त्या कालावधीत हा आकडा ७९९.२३ दशलक्ष होता. (Photo Source: Pexels)
-
बांगलादेश भारताच्या गव्हावर अवलंबून आहे. बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात गहू खरेदी करतो. (Photo Source: Pexels)
-
तांदूळ: तांदूळ हा भारतातून बांगलादेशला तिसरा सर्वाधिक निर्यात होणारा पदार्थ आहे. बासमती व्यतिरिक्त बांगलादेश इतर जातींचा तांदूळ भारताकडून खरेदी करतो. (Photo Source: Pexels)
-
बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात साखरही खरेदी करतो. २०२१- २०२२ मध्ये बांगलादेशने भारताकडून सुमारे ५६५.६ दशलक्ष डॉलर्स किमतीची साखर खरेदी केली होती. (Photo Source: Pexels)
-
बांगलादेशी भारतीय मसाले खातात याशिवाय बांगलादेश इतर धान्य आणि मसाले देखील खरेदी करतो. २०२१- २२ मध्ये, बांगलादेशने ४३.४८ दशलक्ष डॉलर्स किमतीचे इतर धान्य निर्यात केले होते. (Photo Source: Pexels)
-
बांगलादेश भारताकडून ताजी फळं आणि भाज्यांची मागणी करतो याशिवाय बांगलादेश भारताकडून तेल आणि प्रक्रिया केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. याशिवाय बांगलादेश भारतातून इतरही अनेक वस्तू आयात करतो. (Photo Source: Pexels)
हेही पाहा – Photos : मराठमोळा क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरचं पत्नी मितालीबरोबर रोमँटीक फोटोशूट

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा