-
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. प्रचारसभांचा धडाका नेत्यांकडून सुरु असून मतदानाचा दिवस आता जवळ येत असल्याने सगळीकडे लगबगीच वातावरण पाहायला मिळत आहे. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)
-
दरम्यान, मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडावे असे निवडणूक आयोगाने आवाहन केले आहे. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)
-
त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी एक अॅपही सुरु केले आहे. ‘वोटर हेल्पलाईन’ हे अॅप तुम्ही डाऊनलोड करु शकता. (Photo: Pexels)
-
याद्वारे मतदार राजा त्याची सर्व माहिती तसेच त्याचं मतदान केंद्रही जाणून घेऊ शकतो. (Photo: Pexels)
-
दरम्यान, आज आपण तुमचे मतदार यादीतील नाव कसे तपासायचे याबद्दल जाणून घेऊयात. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)
-
सर्वात आधी तुम्हाला निवडणूक आयोगाने जारी केलेल्या http://www.nvsp.in किंवा eci.gov.in या अधिकृत वेबसाईट्सवर भेट द्यायची आहे. (Photo: Pexels)
-
वेबसाईटवरील Serach By Details वर क्लिक करा. सर्चबारमध्ये तुमचं संपूर्ण नाव टाका. (Photo: Pexels)
-
त्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. तुमच्यापुढे स्किनवर नावे आलेली दिसतील. (Photo: Pexels)
-
त्यामध्ये तुमचं नाव दिसेल. मतदाससंघही दिसेल. ही माहिती तुम्ही हवी असल्यास प्रिंट करुन जतन करुन ठेऊ शकता. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)
-
याशिवाय तुम्ही तुमचं मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एसएमएस पद्दतीचाही अवलंब करु शकता. यासाठी तुम्हाला तुमचा Voter ID Number 1950 या क्रमांकावर पाठवायचा असतो. (Photo: Pexels)
-
दरम्यान राज्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…