-
विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर आलेल्या महाराष्ट्रात, महायुतीने लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना मासिक मदत १,५०० वरून २,१०० रुपये आणि २५,००० महिला पोलिस कर्मचारी भरती करण्याचे आश्वासन दिले आहे, तर विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना आणून महिलांना दरमहा ३,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे तसेच एसटीचा मोफत प्रवास करण्याचेही आश्वासन दिले आहे. (Express Photo by Pallavi Smart)
-
२१ ते ५६ वर्षे वयोगटातील ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महाराष्ट्रातील महिला रहिवाशांना या योजनेतून दरमहा रु. १,५०० रू दिले जातात. (Express Photo by Pallavi Smart)
-
नंदुरबारमध्ये ९७ टक्के अर्जदार महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्यास सुरूवात झाली आहे. फोटोमध्ये चौपडे गावातील एक कुटुंब दिसत आहे. (Express Photo by Pallavi Smart)
-
चाळीशीच्या उत्तरार्धात असलेल्या आणि ज्यांचे कुटुंबीय शेतमजूर म्हणून काम करतात त्या सखुबाई गावित म्हणाल्या: “हे (महायुती) लोक पुन्हा निवडून आल्यावर पैसे दुप्पट करतील असे सांगत आहेत तसेच इतर (काँग्रेस) आणखी मोठ्या रकमेचे आश्वासन देत आहेत. पण अन्न आणि औषधे अशीच महागत राहिल्यास या पैशाचा काय उपयोग? (Express Photo by Pallavi Smart)
-
नंदुरबारच्या नवापूर येथील पालीपाडा या आदिवासी वस्तीत राहणाऱ्या ३६ वर्षीय निलिमा वळवी या मजुर कामगार महिलेचे म्हणणे आहे की, ऑगस्टमध्ये तिला या योजनेतून मिळालेले पैसे तिच्या आठ वर्षांची मुलगी देवश्रीच्या खाजगी रुग्णालयातील उपचारासाठी खर्च झाले. (Express Photo by Pallavi Smart)
-
सिंधुदुर्गच्या सांगवे गावात राहणाऱ्या घरकामगार पस्किन डिसूझा म्हणाल्या “माझे पती रोजंदारीवर काम करणारे आहेत आणि बहुतेक दिवस त्यांना काम मिळत नाही. माझा मोठा मुलगा मोटेस हा गोव्यात एका हॉटेलमध्ये काम करायचा, पण त्याचा मृत्यू झाला आणि आता आम्ही जगण्यासाठी धडपडत आहोत. माझा धाकटा मुलगा १२ वीत आहे आणि माझ्या मुलीचे लग्न झाले आहे. ज्या सरकारने मला सर्वात जास्त गरज असताना मला मदत केली आहे त्या सरकारला मतदान करणे माझे कर्तव्यच बनले आहे.”
-
सिंधुदुर्गच्या पुष्पवाडी गावात राहणाऱ्या सुवर्णलता पवार या कॅन्सरमधून बचावलेल्या मतदार म्हणाल्या: “२०२१ मध्ये (कोरोना साथीच्या काळात) मला कर्करोगाचे निदान झाले. मला मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, पण हॉस्पिटल फक्त खूप गंभीर असलेल्या रुग्णांना घेऊन जात होते. त्यामुळे मला कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात जावे लागले आणि माझ्या उपचारासाठी माझ्या दोन्ही मुलांना कामावरून कर्ज घ्यावे लागले. लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाल्यावर मी त्यातून कर्जाचा एक हप्ता फेडला आहे. यासाठी मी सरकारची कृतज्ञ आहे”
-
कुडाळ तालुक्यातील वालावल गावात राहणाऱ्या स्नेहा वालावलकर म्हणाल्या: “माझ्या नवऱ्याचे लवकर निधन झाले, पण माझी मुले सुस्थितीत असल्याने आणि मला आधार देत असल्याने मी पैशांवर (योजनेवर) अवलंबून नाही. पण हे पैसे माझ्या खात्यात येतात आणि मी ते मला हवे तसे वापरता येतात. ते माझे स्वतःचे पैसे आहेत.”
-
सिंधुदुर्गातील माणगाव येथील काजूच्या कारखान्यात काम करणाऱ्या भाग्यश्री राऊत म्हणाल्या, “किमान या मुख्यमंत्र्यांनी (शिंदे) आपला शब्द पाळला आणि आम्हाला पैसे दिले. माझे पती भास्कर यांच्या उपचारासाठी हे पैसे कामी आले.” कारखान्यात काम करणाऱ्या शीतल परब म्हणाल्या, “माझे पती महामारीच्या काळात आजारी पडल्यापासून बरे झालेले नाहीत. माझी दोन शाळेत जाणारी मुलं आहेत आणि मला संपूर्ण कुटुंबासाठी पैसे कमवायचे आहेत आणि हे पैसे खूप उपयोगी पडले. इतर लोक दुप्पट रकमेची आणखी एक योजना देण्याचे आश्वासन देत आहेत, परंतु माझे मत ज्याने पैसे दिले आहेत त्यालाच जाईल.”
-
नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना, गेल्या निवडणुकीत चारपैकी दोन विधानसभेच्या जागा जिंकत भाजपने हा गड भेदला. फोटोमध्ये रेखा पाटील या योजनेतील आणखी एक लाभार्थी दिसत आहे. (Express Photo by Pallavi Smart)
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे म्हणाले: “सर्वाधिक महिला मतदार असलेला हा महिलाभिमुख जिल्हा आहे. या निवडणुकीत इथे एक नवा इतिहास महिला मतदार घडवणार आहेत.”
हेही पाहा- ‘या’ देशातील गुन्हेगारी संपत आल्याने कारागृह पडले होते ओस; जेल कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी शेजारी देशातून आणले गेले कैदी

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?