-
डिसेंबर महिन्याच्या थंडीत अनेक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.
-
विशेषत: ३१ डिसेंबर आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी खास फिरायला जाण्याचा प्लॅन ठरतो, पण यावेळी विमान तिकीट बुकिंग खूप महाग असते. अशावेळी काय करावे सुचत नाही.
-
पण काळजी नका आम्ही, तु्म्हाला स्वस्तात विमान तिकीट मिळवण्यासाठी पाच सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये तुमची ट्रिप प्लॅन करू शकता.
-
१) मंगळवार किंवा बुधवारी करा तिकीट बुक – मंगळवार किंवा बुधवार हे विमान तिकीट खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहेत. या दिवशीची तिकिटे इतर दिवसांपेक्षा स्वस्त असतात, कारण बहुतेक एअरलाइन्स मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांची बुकिंग सिस्टम सेट करतात.
-
यामागचे कारण असे की, विमान कंपन्यांना माहीत आहे की, बहुतेक प्रवासी आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिकीट बुक करतात. तिकीट बुक करणारे बहुतेक शुक्रवार, शनिवार किंवा रविवारीचे तिकीट शोधतात, त्यामुळे त्यांना तिकिटाचे दर जास्त दिसतात.
-
२) प्रवासाच्या २१ दिवस आधी तिकीट करा बुक – जर तुमचा ट्रिपचा प्लॅन आधीच झाला असेल तर विमान तिकीटदेखील आगाऊ बुक करा. आपत्कालीन परिस्थिती वगळता प्रवासाच्या २१ दिवस अगोदर तिकीट बुक करावे.
-
कारण अनेक एअरलाइन्स कंपन्या सिस्टममध्ये अतिशय स्वस्त तिकिटांसाठी ठराविक कोटा ठेवतात, त्यामुळे फक्त पहिल्या २० प्रवाशांना सर्वात कमी किमतीत तिकीट मिळते.
-
३) कधीही एका एअरलाइन्सद्वारे राउंड ट्रिप बुक करू नका – ट्रिपसाठी निघण्याचा दिवस मंगळवार किंवा बुधवार ठेवा, कारण बहुतेक एअरलाइन्स कपंन्यांच्या सिस्टममध्ये या दोन दिवसांत सर्वात कमी बुकिंग असते. तसेच शुक्रवार आणि रविवारच्या तुलनेत या दोन दिवसांत विमानतळांवरही कमी गर्दी असते.
-
याशिवाय नेहमी एकाच एअरलाइनने राउंड ट्रिप्स बुक करू नका. जर एका एअरलाइन्समधून उड्डाण केलेत तर येताना दुसऱ्या एअरलाइन्सचे तिकीट बुक करा, हे तुमच्यासाठी अधिक किफायतशीर ठरेल.
-
४) कुकीज डिलीट करायला विसरू नका -बहुतेक एग्रीगेटर किंवा एअरलाइन्स वेबसाइट्स कुकीज आणि इंटरनेट प्रोटोकॉलद्वारे तुमचा सर्च पॅर्टन फॉलो करतात. तुम्ही कोणत्याही वेबसाइटला जाऊन फ्लाइट तिकिटाची किंमत पाहिल्यास आणि नंतर ती बुक केल्यास, तुम्हाला किंमत वाढलेली दिसू शकते.
-
हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्राउझरमधील इनकॉगनिटो मोड वापरू शकता किंवा कुकीज डिलीट करू शकता.
-
५) एका वेबसाइटवर विसंबून राहू नका –जर तुम्हाला स्वस्तात विमान तिकीट बुक करायचे असेल तर एका वेबसाइटवर अवलंबून राहू नका. गूगलचा जास्तीत जास्त वापर करा. वेगवेगळ्या वेबसाइटला भेट देऊन तिकिटाच्या किमती तपासा.
-
SkyScanner, Cheapflights, Momondo, Kayak, Google Flight या काही वेबसाइट आहेत, ज्यावर तुम्ही तिकिटांची तुलना करू शकता. (फोटो – freepik, pixabay, संग्रहित)
-
(हेही वाचा – ‘जीव लावण्यापेक्षा…” दुकानाबाहेर लावलेली पाटी चर्चेत; Photo होतोय व्हायरल)
Horoscope Today: ज्येष्ठा नक्षत्र व वरीयान योगाचा प्रभाव तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार? वाचा गुरुवारचे राशिभविष्य