-
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की… असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानावर घेतली.राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली.
-
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
-
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्य जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
-
तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी, अभिनेता शाहरूख खान, रणबीर सिंग, अभिनेत्री माधुरी दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
-
दरम्यान केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली होती, यावेळी निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या पैठणीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शपथविधी सोहळ्याला हिरवा आणि गुलाबी मिक्स अशा रंगाची पैठणी नेसली आहे.
-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्यांच्या पारंपरिक साड्यांसाठी ओळखल्या जातात
-
निर्मला सीतारमण यांच्या साडीचं कलेक्शन कायमच चर्चेचा विषय असतो. या साड्यांमधून त्यांनी कायमच परंपरा आणि वैयक्तिक शैली दोन्ही प्रतिबिंबित केल्या आहेत. प्रत्येक वर्षी, अर्थसंकल्पीय सत्रादरम्यानही निर्मला सीतारमण यांची साडी हा भारताच्या विविध प्रादेशिक कारागिरीचा उत्सव साजरा करणारा एक खास आकर्षणाचा विषय असतो.
-
महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी ही शपथ घेतली आहे.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड