-
जगातील प्रत्येक शहराची स्वतःची खासियत आहे. भारतातील शहरांचीही स्वतःची वेगळी कथा आहे. देशात एक असे शहर आहे जे ‘सिटी ऑफ प्राइम मिनिस्टर’ म्हणून ओळखले जाते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
या शहराने देशाला सात पंतप्रधान दिले आहेत. हे दुसरे तिसरे कोणी नसून प्रयागराज आहे ज्याबद्दल अनेक कथा आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या प्रयागराजला संगम शहर असेही म्हणतात. येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. संगमस्थळ त्रिवेणी म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात या स्थानाला विशेष महत्त्व आहे आणि ते पवित्र मानले जाते. दरम्यान, या शहरातून कोण कोण पंतप्रधान झाले ते जाणून घेऊयात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
१- पंडित जवाहरलाल नेहरू
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १८८९ साली प्रयागराज येथे झाला. त्यावेळी लोक या शहराला अलाहाबाद म्हणून ओळखत होते. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यावर त्यांनी येथील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आणि त्यानंतर ते तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
२- लाल बहादूर शास्त्री
‘जय जवान जय किसान’चा नारा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रींनी 1957 आणि 1962 मध्ये प्रयागराजमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. लाल बहादूर शास्त्री 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
3- इंदिरा गांधी
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी यांचाही जन्म प्रयागराजमध्ये झाला. 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 पर्यंत त्यांनी हे पद भूषवले. यानंतर 1980 मध्ये त्या तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
४- राजीव गांधी
इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. राजीव गांधींना प्रयागराज शहराची खूप आवड होती. राजीव गांधी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन यांनी अलाहाबादमधून निवडणूक लढवली. त्याचवेळी राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात प्रयागराजचा खूप विकास झाला. नैनी येथे असलेला हिंदुस्थान केबल कारखाना राजीव गांधी यांचे योगदान आहे. राजीव गांधी 1984 ते 1989 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
5- गुलझारीलाल नंदा
गुलझारीलाल नंदा हे दोन टर्म देशाचे कार्यवाहक पंतप्रधान राहिले आहेत. पहिल्यांदा 1964 मध्ये आणि दुसऱ्यांदा 1966 मध्ये आणि दोन्ही वेळा त्यांनी 13 दिवस कार्यवाहक पंतप्रधानपद भूषवले. गुलझारीलाल नंदा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदव्युत्तर आणि कायद्याचे शिक्षण घेतले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
6- विश्वनाथ प्रताप सिंग
देशाचे आठवे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचा जन्म प्रयागराज येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कला आणि कायद्याचे शिक्षण घेतले. व्हीपी सिंह 1989 ते 1990 पर्यंत 343 दिवस देशाचे पंतप्रधान होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
7- चंद्रशेखर
देशाचे 9 वे पंतप्रधान चंद्रशेखर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलिया येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमए केले. यासोबतच त्यांनी प्रयागराजमधूनच राजकारणाला सुरुवात केली. चंद्रशेखर 1990 ते 1991 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. (फोटोः इंडियन एक्सप्रेस)
हेही पाहा- Pushpa 2: अल्लू अर्जुनपेक्षा जास्त भाव खावून गेला खलनायक भंवर सिंग; कोण आहे हा अभिनेता? त्याची पत्नी, शिक्षण आणि संपत्तीबद्दल जाणून घ्या

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”