-
कॅनडाच्या राजकारणात सध्या भूकंप झाला आहे. अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी लिहिले आहे की, “तुम्ही मला अर्थमंत्री म्हणून पाहू इच्छित नाहीत त्यामुळे मी प्रामाणिकपणे मंत्रिमंडळातून बाहेर पडलो तर बरे होईल”. (Photo: Reuters)
-
त्यांचा राजीनामा सध्या कॅनडातच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय आहे. यानंतर, कॅनडाच्या संसदेत एक आर्थिक अपडेट सादर केले गेले, ज्याच्या आकडेवारीवरून कॅनडाची आर्थिक आणि राजकीय स्थिती हादरली आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. (Photo: Reuters)
-
कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव कायम आहे. मात्र असे असले तरी कॅनडा अनेक गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे. (Photo: Reuters)
-
भारत कॅनडाला मोठ्या प्रमाणात औषधे आणि औषधी उत्पादने पुरवतो. (Photo: Pexels)
-
याशिवाय कॅनडा भारतातून मोठ्या प्रमाणात तयार कपडेही खरेदी करतो. (Photo: Pexels)
-
ऑर्गॅनिक केमिकल्सच्या (सेंद्रिय रसायन) बाबतीतही कॅनडा मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे. (Photo: Pexels)
-
याशिवाय भारतातून लोखंड, पोलाद आणि अभियांत्रिकी उपकरणे देखील कॅनडा खरेदी करतो. (Photo: Pexels)
-
या गोष्टींव्यतिरिक्त, कॅनडा भारतातून बहुतेक दागिने आणि शोभेच्या स्टोन्सची खरेदी करतो. (Photo: Pexels)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार