-
ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे ख्रिसमस. जगातील अनेक देशांमध्ये तसेच भारतामध्येही ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माचे अनुयायी दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस डे साजरा करतात. (Photo: Pexels)
-
25 डिसेंबर रोजी, ख्रिश्चन धर्मीय लोक त्यांचे चर्च आणि त्यांची राहती घरे सजवतात. लोक केकही कापतात आणि विविध खाद्यपदार्थ तयार करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की हा सण पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तसेच दरवर्षी 25 डिसेंबरलाच ख्रिसमस का साजरा केला जातो?, याबद्दलच आज जाणून घेऊयात. (Photo: Pexels)
-
ख्रिश्चन धर्माच्या पवित्र ग्रंथ बायबलनुसार, ख्रिश्चन समुदायातील लोक प्रभू येशूच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी ख्रिसमस हा सण साजरा करतात. बायबलनुसार, इस्रायलमधील जेरुसलेममधील बेथलेहेम येथे येशूचा जन्म इ.स.पू. 4 मध्ये मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी झाला. (Photo: Pexels)
-
ख्रिश्चनांसाठी चर्च ऑफ द नेटिव्हिटी हे ठिकाण सर्वात पवित्र मानले जाते. येथेच येशूचा जन्म झाला होता असे मानले जाते. (Photo: Pexels)
-
ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ बायबलमध्ये व्यक्त केलेल्या माहितीनुसार, वयाच्या 30 व्या वर्षी, येशूने मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करण्यास सुरुवात केली आणि नंतर ठिकठिकाणी लोकांना उपदेश करण्यास सुरुवात केली. (Photo: Pexels)
-
ज्यू धर्मियांना मात्र त्याचे असे करणे आवडले नाही आणि त्यांनी त्याला विरोध केला. यानंतर, एके दिवशी त्याला रोमन गव्हर्नरसमोर हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला वधस्तंभावर खिळण्याची (सुळावर चढविणे) शिक्षा सुनावण्यात आली. (Photo: Pexels)
-
गुड फ्रायडेला त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. ख्रिस्ती धर्माच्या मान्यतेनुसार, वधस्तंभावर खिळल्यानंतर, देवाच्या चमत्काराने येशू पुन्हा जिवंत झाला. यानंतर त्याने ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. (Photo: Pexels)
-
ख्रिश्चन धर्माच्या मान्यतेनुसार, सेक्सटस ज्युलियस आफ्रिकनस यांनी 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर 25 डिसेंबर हा संपूर्ण जगभरात ख्रिसमस डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. (Photo: Pexels)
-
असे देखील मानले जाते की येशू ख्रिस्ताची आई मेरी 25 मार्च रोजी गरोदर राहिली आणि नऊ महिन्यांनंतर 25 डिसेंबर रोजी प्रभु येशूला जन्म दिला. (Photo: Pexels)
-
यासोबतच सूर्याचा जन्म 25 डिसेंबरला होतो असे रोमन लोक मानतात. याशिवाय 1970 मध्ये अमेरिकेने ख्रिसमसला अधिकृत फेडरल सुट्टी जाहीर केली. (Photo: Pexels)
-
असेही मानले जाते की 336 ईसापूर्व रोमच्या पहिल्या ख्रिश्चन सम्राटाच्या कारकिर्दीत ख्रिसमस पहिल्यांदा 25 डिसेंबर रोजी साजरा केला गेला होता, त्यानंतर काही वर्षांनी पोप ज्युलियसने 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा वाढदिवस साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. तेव्हापासून 25 डिसेंबर रोजी पाश्चात्य देशांमध्ये ख्रिसमस डे साजरा केला जाऊ लागला. (Photo: Pexels)
हेही पाहा- पांडवांसाठी भगवान कृष्णाने कौरवांकडून ‘ही’ ५ गावे मागितली होती, आताची त्यांची नावे काय आहेत? जाणून घ्या

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा