-
थायलंडच्या पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या मालमत्तेची माहिती ३ जानेवारी २०२५ ला सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील चैनीच्या वस्तूंचीही माहिती आता मिळाली आहे.
-
पंतप्रधान मोदींची घतलेली भेट
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, थायलंडच्या पंतप्रधानांनी व्हिएतनाममध्ये पूर्व आशिया परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. -
डिझायनर पोशाख
एवढेच नाही तर थायलंडच्या पंतप्रधानांकडे १६७ डिझायनर आउटफिट्स आहेत. या डिझाइन्सची किंमत ७७७,००० डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. -
कार कलेक्शन
शिनावात्रा यांना कार्सची खूप आवड आहे. त्यांच्याकडे एकूण २३ वाहने आहेत. यामध्ये बेंटले फ्लाइंग स्पर हायब्रीड आणि रोल्स रॉइस फँटम कारचा समावेश आहे. -
परदेश दौरा
थायलंडच्या पंतप्रधान सतत सक्रिय असतात. नुकताच त्यांचा मलेशिया दौरा पार पडला. या फोटोंमध्ये शिनावात्रा मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत दिसत आहेत. -
माजी पंतप्रधानांची कन्या
१६ ऑगस्ट २०२४ पासून त्या फेउ थाई पक्षाच्या नेत्या आहेत. शिनावात्रा या राजकीय कुटुंबातील सदस्य असल्याने पंतप्रधान झालेल्या सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. -
दरम्यान, थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा या त्यांच्या जबरदस्त ड्रेस, लूक्स आणि सुंदरेमुळेही प्रसिद्ध आहेत.
-
महागड्या हँडबॅग्ज
थायलंडच्या पंतप्रधानांकडे अनेक महागड्या हँडबॅग्जचा संग्रह आहे. ताज्या अहवालानुसार, त्यांच्याकडे एकूण २१७ लग्झरी हँडबॅग आहेत. त्यांची किंमत २.२३ दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. -
(सर्व फोटो साभार- Paetongtarn Shinawatra/Instagram) हेही पाहा- Photos : शर्वरी वाघचं मखमली सौंदर्य, नवं फोटोशूट व्हायरल

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…