-
हॉटेल आणि ट्रॅव्हल बुकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी OYO सध्या चर्चेत आहे. Oyo ने चेक-इन नियम बदलले आहेत त्यामुळे यापुढे अविवाहित जोडप्यांना खोल्या दिल्या जाणार नाहीत. (Photo: OYO/Facebook)
-
या नियमानंतर आता फक्त पती-पत्नीला ओयोच्या हॉटेलमध्ये रूम मिळू शकणार आहे. दरम्यान, हे नवीन ‘चेक-इन’ धोरण सध्या मेरठमधील ओयो हॉटेल्समध्ये लागू आहे. चेक इन करताना जोडप्यांना त्यांच्या नात्याचा वैध पुरावा द्यावा लागेल. यामध्ये ऑनलाइन बुकिंगचाही समावेश आहे. (Photo: OYO/Facebook)
-
OYO रूम्सना OYO हॉटेल्स आणि होम्स असेही म्हणतात. ओयो केवळ भारतातच नाही तर परदेशातही खूप प्रसिद्ध आहे. (Photo: OYO/Facebook)
-
ओयो ही भारतातील सर्वात मोठी हॉटेल चेन कंपनी आहे. याचे संस्थापक रितेश अग्रवाल आहेत आणि त्यांनी २०१२ मध्ये या कंपनीची सुरुवात केली. (Photo: OYO/Facebook)
-
ओयोची चेन केवळ भारतातच नाही तर आशिया, युरोप आणि अमेरिकेतही पसरलेली आहे. (Photo: OYO/Facebook)
-
जगातील ८० देशांमधील ८०० शहरांमध्ये कंपनीचे साम्राज्य पसरलेले आहे, यावरून ओयोचं क्षेत्र किती मोठं आहे याची कल्पना येते. या ८०० शहरांमध्ये ४३,००० हून अधिक मालमत्ता आणि १ दशलक्ष खोल्या आहेत. ही २०२० सालची आकडेवारी आहे. (Photo: OYO/Facebook)
-
त्याचबरोबर २०१९ पर्यंत, OYO चे जागतिक स्तरावर १७,००० पेक्षा जास्त कर्मचारी होते, त्यापैकी सुमारे ८,००० भारत आणि दक्षिण आशियामध्ये होते. (Photo: OYO/Facebook)
-
हुरुन रिच लिस्ट २०२४ (Hurun Rich List 2024) नुसार, Oyo चे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल यांची एकूण संपत्ती १,९०० कोटी रुपये आहे. (Photo: OYO/Facebook)
हेही पाहा- HMPV म्हणजे काय? हा विषाणू किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत?
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”