-
दृष्टी IAS कोचिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती हे एक मोटिवेशनल वक्ते आहेत. सोशल मीडियावर दररोज त्यांचा एक ना एक व्हिडिओ व्हायरल होत असतो. (फोटो: विकास दिव्यकीर्ती/इन्स्टा)
-
सध्या विकास दिव्यकीर्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांंनी प्रेम विवाह का अयशस्वी होतात यावर भाष्य केलं आहे. (फोटो: पेक्सेल्स)
-
विकास दिव्यकीर्ती सांगतात की प्रेमविवाह अयशस्वी होण्याच्या घटना घडतात कारण लग्नापूर्वी तुम्ही स्वप्नांच्या दुनियेची कल्पना करता. परंतू वास्तवात आयुष्य तसे आणि तितके सुंदर नसते. (फोटो: पेक्सेल्स)
-
पुढे विकास दिव्यकीर्ती सांगतात की, जोपर्यंत तुम्ही प्रियकर आणि प्रेयसी असता तोपर्यंत आयुष्य खूप सुंदर असते. लग्नापूर्वी व्यक्ती प्रेमात पडतो तेव्हा तो बाईक चालवतो, एकत्र आईस्क्रीम खातो, गप्पा मारतो आणि हे सर्व खूप सुंदर वाटते. त्या काळात नात्यात कोणतीही जबाबदारी नसते. (फोटो: पेक्सेल्स)
-
मात्र लग्नानंतर घराचे भाडे भरावे लागते आणि घरातील सर्व साहित्यही खरेदी करावे लागते. ते पुढे म्हणतात की कधी कधी ती व्यक्ती आपल्याला प्राप्त न होणंच छान असतं, कारण तुम्ही एकमेकांसाठी बनला वगैरे या सर्व भ्रामक कल्पना असतात, याशिवाय काहीही नाही. (फोटो: पेक्सेल्स)
-
केवळ सौंदर्य पाहून प्रेमात पडता येत नाही. ते म्हणतात की सौंदर्य पाहून लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यापेक्षा तुम्ही अभ्यास केलेला बरा. (फोटो: पेक्सेल्स)
-
जीवनाचा खरा संघर्ष लग्नानंतर सुरू होतो, असे विकास दिव्यकीर्ती सांगतात. कारण लग्नानंतर पूर्ण वेळ एकमेकांसोबत घालवावा लागतो आणि अशा परिस्थितीत एकमेकांना आवडत नसतानाही अनेक सवयींबाबत आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. (फोटो: पेक्सेल्स)
-
यावर मुलांनी विकास दिव्यकीर्ती यांना विचारले की, तुमचाही प्रेम विवाहच झालेला आहे, यावर ते म्हणाले की, जर कोणी अशा गोष्ट शेअर करत असेल, तर त्यालाच असा काही अनुभव आला आहे हे समजून जा…, हे ऐकून उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला. (फोटो: विकास दिव्यकीर्ती/इन्स्टा)
-
विकास दिव्यकीर्ती सांगतात की, जसा आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास वेगळा आणि त्यानंतरचा प्रवास वेगळा. त्याचप्रमाणे लग्नापूर्वीचा प्रेमाचा प्रवास आणि लग्नानंतरचा प्रवास पूर्णपणे वेगळा आहे. संघर्षाशिवाय जीवन नाही, असेही ते म्हणतात. (फोटो: पेक्सेल्स)
-
विकास दिव्यकीर्ती यांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या जीवनात प्रेम असेल तर सर्वात मोठा धोका एक म्हणजे अभ्यासापासून दूर जाणे, दुसरे म्हणजे विचलित होणे. त्यामुळे योग्य गोष्टी योग्य वेळी आणि योग्य मार्गाने झाल्या तरच जीवनाचे सौंदर्य वाढते. (फोटो: पेक्सल्स) हेही पाहा- Photos : स्वित्झर्लंडमधील बर्फाळ वातावरणात बॉलीवूड कपल ‘सैफिना’चे रोमँटिक क्षण, फोटो
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”