-
१३ जानेवारीपासून महाकुंभ मेळा २०२५ सुरू होत आहे. प्रयागराज येथे होणाऱ्या या मेळ्यात देशासह जगभरातून भाविक स्नानासाठी येणार आहेत.
-
येथे येणाऱ्या भाविकांच्या राहण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कदाचित अशी व्यवस्था याआधी तुम्हीही कधी पाहिली नसेल.
-
संगमाच्या काठावर आश्रमापासून धर्मशाळा आणि अगदी खास टेंट सिटीपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे.
-
यासह येथे खास डोम सिटी बांधण्यात आली, ज्याची सध्या खूप चर्चा आहे. कारण या डोम सिटीमध्ये बांधलेल्या रुम्समध्ये अशा काही लक्झरीयस सुविधा दिल्या आहे की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
-
पण डोम सिटीमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आजच जाणून घ्या.
-
डोम सिटी येथील प्रत्येत खोली अतिशय आलिशान आहे. 3 हेक्टरवर बांधलेली ही डोम सिटी फायर आणि बुलेट प्रूफ आहे.
-
विशेष स्नानाच्या दिवशी, या डोम सिटीमधील एका खोलीचे दररोजचे भाडे १,१०,००० रुपये आहे.
-
त्याच वेळी, कुंभ मेळ्यादरम्यान सामान्य दिवसांमध्ये याच खोल्यांचे एका दिवसाचे भाडे ८१,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
-
तर सामान्य दिवसांमध्ये, डोम सिटीमध्ये रूम बुक करण्यासाठी तुम्हाला ४१,000 रुपये मोजावे लागतील. (फोटो: MahaKumbh 2025, DoT India,PTI/ Twitter)

अखेर ‘तो’ निर्णय रद्द… शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापनाने सोडला सुटकेचा निश्वास