-
भारतीय संस्कृतीत महाकुंभमेळ्याला (Maha Kumbh Mela) अनन्यसाधारण महत्त्व आहे.
-
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथील २०२५चा हा महाकुंभ मेळा खूप खास असल्याचे म्हटले जात आहे.
-
कारण दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा १४४ वर्षांनंतर खास संयोग निर्माण करत आहे.
-
हा कुंभमेळा १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत असल्याचे म्हटले जात आहे.
-
महाकुंभ मेळ्यात माळा विकणारी सुंदर मुलगी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
-
या व्हिडीओमधील मुलीचे डोळे घारे असून तिने काजळ लावले होते.
-
या मुलीचं नाव मोनालिसा भोसले (Monalisa Bhosle) असे आहे.
-
मोनालिसा मुळची मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh Indore) इंदूरची रहिवाशी आहे.
-
मोनालिसा इन्स्टाग्रामवर सक्रिय असून तिने फोटो आणि रील व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
महाकुंभ मेळ्यात मोनालिसाच्या मागे वृद्धांपासून तरुणांपर्यंत तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती.
-
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मोनालिसाला तिच्या वडिलांनी इंदूरला पाठवले आहे.
-
महाकुंभ मेळ्यात माळा विक्री होत नसून मोनालिसाला मानसिक त्रास होत असल्याचे म्हटले जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मोनालिसा भोसले/इन्स्टाग्राम)
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…