-
डोनाल्ड ट्रम्प यांनी ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. चार वर्षांच्या गॅपनंतर ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आले आहेत.
-
त्यांच्या शपथविधी सोहळ्यात देशभरातून आणि जगभरातून अनेक दिग्गज सहभागी झाले होते. (फोटो: एपी)
-
भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शपथविधी सोहळ्याचे पाहुणे होते. (फोटो: एपी)
-
व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आहे. अशा स्थितीत डोनाल्ड ट्रम्पही इथेच राहणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये किती खोल्या आहेत, राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय किती खोल्या वापरतात ते आज आपण जाणून घेऊ. (फोटो: एपी)
-
व्हाईट हाऊसमध्ये एकूण १३२ खोल्या आहेत आणि सहा मजले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात आणि एकूण १६ खोल्या वापरतात. (फोटो: पेक्सेल्स)
-
व्हाईट हाऊसमध्ये ज्या मजल्यावर राष्ट्रपती राहतात तिथे त्यांच्यासाठी एक स्वयंपाकघर देखील आहे, जिथे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी जेवण तयार केले जाते. हे स्वयंपाकघर २४ तास चालते. (फोटो: एपी)
-
व्हाईट हाऊसमध्ये एकूण ३५ बाथरूम आहेत. यासोबतच हाऊसमध्ये अनेक कार्यालयेही आहेत. व्हाईट हाऊसच्या तळमजल्यावर १० खोल्या आहेत. पहिल्या मजल्यावर अनेक कार्यालयं तसेच मनोरंजनासाठी राखीव ८ खोल्या ठेवण्यात आल्या आहेत. (फोटो: रॉयटर्स)
-
व्हाईट हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर १६ खोल्या असून राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंब या मजल्यावर राहतात. व्हाईट हाऊसच्या मास्टर बेडरूम आणि ‘यलो ओव्हल रूम’ व्यतिरिक्त दुसऱ्या मजल्यावर अनेक बेडरूम आहेत. (फोटो: एपी)
-
व्हाईट हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावर २० खोल्या आहेत ज्यांचा वापर राष्ट्रपतींशी संबंधित कार्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी केला जातो. याच्यावर आणखी तीन मजले आहेत जे सुरक्षा आणि इतर कारणांसाठी वापरले जातात. (फोटो: रॉयटर्स)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”