-
राम मंदिराच्या उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभात राम लल्लाची मूर्ती विधीपूर्वक आसनावर ठेवण्यात आली होती. हिंदू कॅलेंडरमधील पौष महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान कूर्म द्वादशीला आयोजित केलेल्या या पवित्र कार्यक्रमात अनेक भक्त, सेलिब्रिटी आणि मान्यवर उपस्थित होते, हिंदू चंद्र दिनदर्शिकेतील शुक्ल पक्ष ११ जानेवारीशी जुळत असल्याने या वर्षी, वर्धापन दिन २२ जानेवारी ऐवजी ११ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.
-
२०२४ मध्ये मंदिराच्या भव्य उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य विधींचे नेतृत्व केले होते. (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)
-
मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात दिसले. (प्रतिमा स्त्रोत: एक्सप्रेस फोटो)
-
११ जानेवारी २०२४ रोजी हिंदू दिनदर्शिकेच्या अनुषंगाने झालेल्या ऐतिहासिक ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभाच्या एक वर्षानंतर सर्व विधींचे पालन करण्यात आले. (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)
-
भव्य मंदिरातील रामलल्लाची मूर्ती ‘बाल राम’ म्हणून ओळखली जाते कारण ती देवाचे पाच वर्षांच्या मुलाचे रूप दाखवते . (प्रतिमा स्त्रोत: पीटीआय)
-
गेल्या वर्षी मंदिर परिसरात विविध आध्यात्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामुळे उत्सव धार्मिक विधींनी गाजला होता. (प्रतिमा स्त्रोत: पीटीआय)
-
२२ जानेवारी, २०२४ रोजी मंदिराच्या भव्य उद्घाटनाच्या वेळी पाहिल्याप्रमाणे या प्रसंगीही मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली पाहायला मिळाली. (प्रतिमा स्त्रोत: AP)
-
अहमदाबादमध्ये भगवान राम आणि राम मंदिर दर्शवणारी सुंदर रांगोळी तयार केली गेली. (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)
-
आणखी एक कलाकृती ज्यामध्ये फुलांपासून राम आणि धनुष्यबाण बनवलेले दिसत आहे. (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)
-
हेही पाहा- अनेक गोल्फ क्लब, प्रसिद्ध इमारती ते भारतातील व्यवसाय; डोनाल्ड ट्रम्प किती श्रीमंत आहेत? वाचा संपत्तीची माहिती (प्रतिमा स्त्रोत: रॉयटर्स)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”