-
मुकेश अंबानी भारतातील आणि जागतिक स्तरावरील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे, त्यांच्याकडे अलिशान कार्सचे मोठे कलेक्शन आहे, ज्यामध्ये सुमारे १७० वाहनांचा समावेश आहे.
-
मुकेश अंबानी यांच्याकडे Rolls Royce Phantom ही भारतातील सर्वात महागडी कार आहे, जी तिच्या आलिशान इंटीरियरसाठी ओळखली जाते. स्मूथ राईडसह यात अनेक फिचर्स आहेत. या कारमध्ये 6.75 लीटर V12 पेट्रोल इंजिन आहे, या कारची किंमत 13 कोटी 50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. (Photo: rolls-roycemotorcars.com)
-
Mercedes-Maybach Benz S660 Guard ही मुकेश अंबानींच्या कार कलेक्शनमधील सर्वात महत्वाची कार मानली जाते. जी बुलेट्स फ्रू कार आहे, यात 6-लिटर V8 इंजिन आहे जे 523bhp आणि 830Nm टॉर्क जनरेट करते, सेफ्टी आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते.(Photo: mercedes-benz.com)
-
मुकेश अंबानी यांच्याकडे मॅट ब्लॅक BMW 760Li High Security कार आहे, ही देखील एक बुलेटप्रूफ कार आहे. ही कार 544bhp आणि 880Nm टॉर्क जनरेट करते. यात 6-लिटर V12 इंजिन आहे. या कारची बाजारातील किंमत सुमारे 8.50 कोटी रुपये आहे.(photo: bmw-special-sales.com)
-
Ferrari SF90 Stradale हे फरारीचे पहिली हायब्रिड हायपर कार मॉडेल आहे, ही एक महत्त्वाची स्पोर्ट्स कार आहे. अंबानींनी ही कार २०१९ मध्ये विकत घेतली, यात तीन इलेक्ट्रिक मोटर्ससह 4-लिटर V8 इंजिन देण्यात आले आहे, जी 769bhp पावर जनरेट करते, या कारमध्ये तीन इलेक्ट्रिक मोटार आहे, फरारी SF90 Stradale चे एकूण पॉवर आउटपुट 986 bhp आहे.
-
या कारमध्ये ॲडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार 6 लीटर डब्ल्यू १२ इंजिनसह येते आणि यात एकापेक्षा एक लक्झरी फीचर्स आहेत. या कारची किंमत ३ कोटी ६९ लाख आहे. मुकेश अंबानी यांची ही आवडती कार आहे. (photo: Bentleymotors.com)
-
५.२ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या कारमध्ये V12 इंजिनसह 211 mph चा पीक स्पीड आहे. ही कार जबरदस्त इंटिरिअर आणि पावरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते.
-
४.५५ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या कारचे इंटिरियर, जबरदस्त आहे. तसेच चांगल्या परफॉर्मन्स आणि आयकॉनिक डिझाइनमुळे ही कार ओळखली जाते. या कारमध्ये शक्तिशाली आणि जबरदस्त फिचर्स आहेत. या कारमधून अंबानीचे कार प्रेम दिसून येते. (Photo: Mercedes-benz.com)
-
Aston Martin Rapide ची किंमत रु. ३.८ कोटी आहे, त्यात हाय टेक फिचर्स असून यातील इंटिरिअर देखील जबरदस्त आहे, आहे. ज्यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. या कारच्या मदतीने अंबानी 203 मैलांचे अंतर केवळ एका तासात पार करू शकतात. (photo: astonmartin.com)
-
३.१५ कोटी रुपयांच्या लॅम्बोर्गिनी उरूस हे टॉपचे मॉडेल आहे, या कारचे मायलेज ७,८७ Kmpl आहे, ही कार अतिशय अत्याधुनिक फिचर्सने सुसज्ज आहे. (photo: रॉयटर्स)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल