-
अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत २०२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करणार आहेत. मोदी सरकार ३.० च्या या अर्थसंकल्पाकडून उद्योग हितधारक आणि करदात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. (Photo: Indian Express)
-
दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टींवर कर देतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक प्रकारचे कर भरावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात किती प्रकारचे कर आहेत आणि कोणते आहेत? चला त्याबद्दल जाणून घेऊया. (Photo: Pexels)
-
भारतात तीन प्रकारचे कर लावले जातात. पहिला प्रत्यक्ष कर, दुसरा अप्रत्यक्ष कर आणि तिसऱ्यामध्ये येतात इतर कर. (Photo: Indian Express)
-
प्रत्यक्ष कर
प्रत्यक्ष करांमध्ये आयकर, कॉर्पोरेट कर, भांडवली नफा कर, संपत्ती कर, भेट कर आणि सुरक्षा व्यवहार कर यांचा समावेश होतो. (Photo: Pexels) -
अप्रत्यक्ष कर
अप्रत्यक्ष कर म्हणजे या प्रत्यक्ष करांमध्ये सेवा कर, आयात शुल्क, विक्री कर, व्हॅट, जीएसटी आणि जकात शुल्क यांचा समावेश होतो. (Photo: Pexels) -
इतर कर
इतर प्रकारच्या करांमध्ये करमणूक शुल्क, शिक्षण कर, व्यावसायिक कर, मालमत्ता कर, नोंदणी शुल्क आणि टोल टॅक्स यासारख्या करांचा समावेश होतो. (Photo: Pexels) -
सर्वाधिक कर कुठून येतात?
सरकारच्या महसुलामध्ये सर्वात मोठा हिस्सा अप्रत्यक्ष करांमधून येतो. दरम्यान, प्रत्येकाला जीएसटी भरावा लागतो ज्यामध्ये औषधे, वाहने, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, कपडे, मोबाईल फोन आणि वाहने यांचा समावेश होतो. (Photo: Pexels) -
दरम्यान, प्रत्येकाला जीएसटी भरावा लागतो ज्यामध्ये औषधे, वाहने, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, कपडे, मोबाईल फोन आणि वाहने यांचा समावेश होतो. (Photo: Jansatta)
-
हेही पाहा-
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…