-
प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात केवळ देशातूनच नव्हे तर जगभरातून भाविक पवित्र संगमात स्नान करण्यासाठी येत आहेत. आत्तापर्यंत करोडो लोकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. (फोटो: पीटीआय)
-
महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. २६ जानेवारी २०२५ पर्यंत १३.२१ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. (फोटो: पीटीआय)
-
दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरीन पॉवेल जॉब्सशिवाय इतर अनेक विदेशी भाविकांचीही महाकुंभात चर्चा होती. (फोटो: पीटीआय)
-
महाकुंभाचे अनेक फोटो जगभर व्हायरल झाले. आता नासाच्या एका अंतराळवीरानेही महाकुंभाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. (फोटो: पीटीआय)
-
ही छायाचित्रे अंतराळातून घेण्यात आली आहेत जी अंतराळवीर डॉन पेटिटने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर (आता X) शेअर केली आहेत. (फोटो: पीटीआय)
-
डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) महाकुंभाची ही छायाचित्रे घेतली आहेत. (फोटो: डॉन पेटिट/ट्विटर)
-
या छायाचित्रांमध्ये संगम शहर प्रयागराज प्रकाशाने भरलेले दिसत आहे. ही छायाचित्रे रात्री अंतराळातून क्लिक करण्यात आली आहेत. (फोटो: डॉन पेटिट/ट्विटर) हेही पाहा- Mahakumbh Mela 2025 : अखिलेश यादवांचं त्रिवेणी संगमावर स्नान; ११ वेळा डुबकी मारुन सूर्यनमस्कार, पाहा फोटो

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश