अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारी रोजी संसदेत २०२५-२६ साठी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारमण २०१९ पासून भारत सरकारच्या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून काम करत आहेत.पण तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा पगार किती आहे.पगाराव्यतिरिक्त अर्थमंत्र्यांना अनेक प्रकारचे भत्ते आणि सुविधा मिळतात.पगार आणि सर्व भत्त्यांसह, अर्थमंत्र्यांना दरमहा मिळणारे वेतन अंदाजे ४,००,००० रुपये आहे.याबरोबरच निर्मला सीतारमण यांना मंत्री म्हणून कामावर असताना दररोज दोन हजार रुपये भत्ता मिळतो.त्याचबरोबर संसदेच्या अधिवेशनात किंवा कोणत्याही सरकारी दौऱ्यावर गेल्यावर त्यांना प्रवास भत्ताही मिळतो.प्रवासादरम्यान मोफत राहण्याची सोयही उपलब्ध आहे.हेही पाहा- Photos : निर्मला सीतारमण यांना ही साडी कोणी भेट दिली आहे? या राज्याशी आहे खास कनेक्शन…