-
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे २०२५ चे निकाल जाहीर झाले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने २७ वर्षांनंतर राजधानीत दणदणीत विजय नोंदवला आहे. आम आदमी पक्षाचा (आप) दारुण पराभव करत भाजपने दिल्लीत सत्ता काबीज केली आहे. (Photo: PTI)
-
पण याआधी दिल्लीमध्ये भाजपाने किती वेळा सरकार बनवले आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? भाजपाच्या दिल्लीतील राजकीय प्रवासावर एक नजर टाकूया. (Photo: PTI)
-
दिल्लीमध्ये १९५२ ते १९५६ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार होते, परंतु त्यानंतर ३७ वर्षे (१९५६-१९९३) दिल्लीत मुख्यमंत्री पद नव्हते. १ नोव्हेंबर १९५६ रोजी दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आणि लेफ्टनंट गव्हर्नर (उपराज्यपाल) यांनी ३७ वर्षे शासनाचा कारभार पाहिला. (Photo: Express Archives)
-
१९९३ मध्ये दिल्ली विधानसभेची स्थापना झाली आणि पुन्हा निवडणुका झाल्या. या वर्षी दिल्लीला पुन्हा एकदा मुख्यमंत्री मिळाला आणि भाजपाने त्यांचे पाहिलं सरकार स्थापन केलं. (Photo: PTI)
-
१९९३: भाजपाने पहिल्यांदा सरकार स्थापन केले
१९९३ मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या, त्यात भाजपने बहुमताने सरकार स्थापन केले. मात्र, या कार्यकाळात भाजपला तीनदा मुख्यमंत्री बदलावे लागले. (Photo: PTI) -
१. मदन लाल खुराना (१९९३-१९९६)
भाजपाचे मदन लाल खुराना दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री झाले. २७ महिने त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. काही वादानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. (Photo: Express Archives) -
२. साहिब सिंग वर्मा (१९९६-१९९८)
मदनलाल खुराणा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने साहिब सिंग वर्मा यांना मुख्यमंत्री केले. ते ३१ महिने दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले. (Photo: Express Archives) -
३. सुषमा स्वराज (१९९८)
साहिब सिंह वर्मा यांच्यानंतर भाजपाने सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केले. त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ ५२ दिवसांचा होता. (Photo: Express Archives) -
१९९८: काँग्रेसचे पुनरागमन
१९९८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय नोंदवला आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री झाल्या. शीला दीक्षित सलग तीन वेळा (१९९८-२०१३) दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या. त्याच दिल्लीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिल्या होत्या. (Photo: Express Archives) -
२०१३: भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या
२०१३ च्या निवडणुकीत भाजपाने ३२ जागा जिंकल्या, मात्र बहुमत मिळाले नाही. आम आदमी पार्टीने (आप) २८ जागा जिंकल्या आणि काँग्रेसच्या (८ जागा) पाठिंब्याने सरकार स्थापन केले. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले, पण ४८ दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला. (Photo: Express Archives) -
२०१५ आणि २०२४: आपचे वर्चस्व
२०१५ मध्ये आम आदमी पक्षाने ६७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाला फक्त 3 जागांवर विजय मिळाला होता. २०२० मध्ये पुन्हा ‘आप’ने मोठा विजय मिळवला आणि ६२ जागा जिंकल्या, तर भाजपला फक्त ८ जागा जिंकता आल्या. (Photo: Express Archives) -
२०२५: २७ वर्षांनी दिल्लीत पुन्हा भाजपा सत्तेत
आता २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने जबरदस्त पुनरागमन करत बहुमत मिळवले आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाचे (आप) मोठे नुकसान झाले आहे. (Photo: PTI) -
अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासारखे बडे नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्याच वेळी भाजपा कार्यालयात विजयाचा जल्लोष करण्यात आला असून २७ वर्षांनंतर पुन्हा दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. (Photo: Express Archives)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”