-
भारतीय फूडटेक कंपनी झोमॅटोने ६ फेब्रुवारीला कंपनीचे नाव बदलून ‘इटर्नल’ ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. FoodieBay पासून सुरू झालेल्या ते Zomato ते Eternal पर्यंत कंपनीने केलेल्या प्रवासावर एक नजर टाकुयात. (Photo: Social Media)
-
झोमॅटोची स्थापना २००९ मध्ये FoodieBay म्हणून दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डाह यांनी केली. कंपनीने सुरुवातीला देशातील रेस्टॉरंट-लिस्टिंग आणि शिफारस पोर्टल म्हणून कामाची सुरुवात केली. (Photo: Social Media)
-
त्यानंतर २०१० मध्ये कंपनीने झोमॅटो म्हणून पुन्हा एकदा ब्रॅण्डिंग केले. नवा मार्ग शोधणे त्यामागचा उद्देश होता. माध्यमांतील माहितीनुसार त्यांनी यूएई, यूके आणि फिलीपिन्समध्ये कंपनीचे कार्य मोठे करण्याचा प्रयत्न केला. (Photo: Social Media)
-
झोमॅटोने २०१५ मध्ये भारतात अन्न वितरण क्षेत्रात (Food Delivery) प्रवेश केला. (Photo: Social Media)
-
त्यापुढे २०१७ मध्ये झोमॅटो गोल्ड पर्याय सादर केला. ही एक सदस्यत्व योजना आहे जी ग्राहकांना ॲपद्वारे ऑर्डर केल्यास जेवण आणि डिलिव्हरीवर सूट (Discount) देते. (Photo: Social Media)
-
कोरोना महामारीच्या काळात, झोमॅटोने झोमॅटो मार्केट अंतर्गत किराणा सामान आणि जीवनावश्यक वस्तू वितरीत करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान कॉन्टॅक्टलेस डायनिंगची प्रक्रियेचा कंपनीला शोध लागला. (Photo: Social Media)
-
Zomato ने २०२० मध्ये सर्व-स्टॉक डीलमध्ये प्रतिस्पर्धी कंपनी Uber Eats विकत घेतली. (Photo: Social Media)
-
कंपनीने देशांतर्गत व्यवसायावर भर देत भारत आणि UAE मधील व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. (Photo: Social Media)
-
झोमॅटोने जून २०२२ मध्ये ब्लिंकिट (पूर्वीचे ग्रोफर्स) ५६८ दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले आणि त्यांच्या व्यापार क्षमतांना चालना दिली. (Photo: Social Media)
-
दरम्यान आता नाव बदलल्यानंतर, Eternal मध्ये चार प्रमुख व्यवसाय असतील – फूड डिलिव्हरी व्हर्टिकल झोमॅटो, क्विक-कॉमर्स युनिट ब्लिंकिट, लाइव्ह इव्हेंट बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि किचन सप्लाय युनिट हायपरप्युअर. (Photo: Social Media) हेही पाहा – जगातील सर्वात धोकादायक तुरुंग; एका दिवसात झालेला ६२ जणांचा मृत्यू, पुन्हा का आला चर्चेत?
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”